आता शाळकरी मुलांच्या 'या' गोष्टी रेशनच्या दुकानात मिळणार...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 मार्च 2020

 मुंबई: राज्यातील रेशनिंग दुकानातून स्टेशनरी वस्तू विक्रीला अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे रेशनिंग दुकानात लवकरच वह्या,पुस्तकांसह सर्व प्रकारच शैक्षणिक साहित्य विकत घेता येणार आहे. परंतु, त्यांचे तुलनात्मक दर काय असतील हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

 मुंबई: राज्यातील रेशनिंग दुकानातून स्टेशनरी वस्तू विक्रीला अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे रेशनिंग दुकानात लवकरच वह्या,पुस्तकांसह सर्व प्रकारच शैक्षणिक साहित्य विकत घेता येणार आहे. परंतु, त्यांचे तुलनात्मक दर काय असतील हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

राज्यातील रास्तभाव दुकानदारांचे उत्पन्न वाढावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.शासनाचे अवर सचिव प्र. गि. चव्हाण यांनी याबाबतचा अध्यादेश जारी केला आहे. यासंबंधी कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. राज्यातील रास्तभाव दुकानदारांचे उत्पन्न वाढावे यासाठी रास्तभाव दुकानातून सार्वजनिक व्यवस्थे अंतर्गत वितरित होणाऱ्या वस्तूंसह गहू, तांदूळ, खाद्यतेल, कडधान्ये, डाळी, गुळ, शेंगदाणे, रवा, मैदा, चणापीठ, भाजीपाला व इतर खुल्या बाजारातील वस्तू तसेच दुध व दुग्धजन्य पदार्थ, प्रमाणित बी-बियाणे, कोल्हापूर जिल्हा खादी ग्रामोद्योग संघ यांनी उत्पादित केलेल्या सर्व वस्तू विक्री करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. त्याच धर्तीवर रास्तभाव, शिधावाटप दुकानांमध्ये स्टेशनरी वस्तू विक्रीसाठी ठेवण्यास परवानगी देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. 

हेही वाचा:  मातोश्रीची मर्जी राखण्यात प्रियंका चतुर्वेदी यशस्वी:मिळाली राज्यसभेची उमेदवारी  

राज्यातील रास्तभाव दुकानदारांचे उत्पन्न वाढावे यासाठी रास्तभाव दुकानांमध्ये स्टेशनरी वस्तू व शाळेसाठी उपयुक्त साहित्य विक्रीसाठी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. या वस्तूंचे दुकानांपर्यंत वितरण व विक्रीपोटी मिळणारे कमिशन याबाबत रास्तभाव दुकानदारांनी संबंधित कंपनीच्या वितरकांशी परस्पर संपर्क साधावा. हा व्यवहार संबंधित कंपनी व त्यांचे घाऊक व किरकोळ वितरण आणि रास्तभाव दुकानदार यांच्यामध्ये राहील, यात शासनाचा कोणताही सहभाग अथवा हस्तक्षेप राहणार नाही, असे या अध्यादेशात नमूद आहे. 

हेही वाचा: कोरोनाच्या धास्तीमुळे मुंबई -पुणे  मंदावला...   

शासनाने वितरणाची प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी कामकाज ऑनलाइन करण्यावर भर दिला जात आहे. स्वस्त धान्य दुकानात माल केव्हा आला, त्याचे वितरण कधी होणार याची माहिती नागरिकांना होण्यासाठी एसएमएस प्रणाली सुरू केली आहे. नागरिकांच्या तक्रारींसाठी ऑनलाइन तक्रारीची सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

now stationary will available at ration stores read full story

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: now stationary will available at ration stores read full story