esakal | कहर थांबेनाच ! राज्यात आज कोरोनाबाधितांची संख्या हजार पार, एका दिवसात 48 जणांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

maharashtra

कोव्हिड-19 विषाणू संसर्गाने शनिवारी राज्यातील आणखी 48 व्यक्तींचा बळी घेतला. मुंबईत 27, पुणे शहरात 9, मालेगाव शहरात 8 आणि अकोला शहर, नांदेड शहर, अमरावती शहर व पुणे जिल्ह्यात प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला.

कहर थांबेनाच ! राज्यात आज कोरोनाबाधितांची संख्या हजार पार, एका दिवसात 48 जणांचा मृत्यू

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : शनिवारी राज्यात 48 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला; एका दिवसातील मृतांची ही सर्वाधिक संख्या आहे. त्यामुळे कोरोनाबळींचा आकडा 779 वर पोहोचला आहे. राज्यात 1165 नवीन रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधितांची एकूण संख्या 20 हजार 228 झाली आहे. आणखी 330 रुग्ण बरे होऊन घरी गेले; त्यामुळे आतापर्यंत एकूण 3800 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

हे ही वाचा : तुमचं काम कौतुकास्पद, मात्र कायद्याचे भान ठेवा; उच्च न्यायालयाचे खडे बोल...

कोव्हिड-19 विषाणू संसर्गाने शनिवारी राज्यातील आणखी 48 व्यक्तींचा बळी घेतला. मुंबईत 27, पुणे शहरात 9, मालेगाव शहरात 8 आणि अकोला शहर, नांदेड शहर, अमरावती शहर व पुणे जिल्ह्यात प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला. मालेगाव शहरातील 8 मृत्यू 25 एप्रिल ते 8 मे या कालावधीतील आहेत. 

मोठी बातमी : डिपार्टमेंटमध्ये फोफावतोय कोरोना; राज्यात एकूण 714 पोलिस कोरोना बाधीत

शनिवारी 21 पुरुष आणि 27 महिलांचा मृत्यू झाला. या 48 जणांपैकी 27 रुग्ण 60 वर्षे किंवा त्यावरील, 18 रुग्ण 40 ते 59 वयोगटातील आणि 3 रुग्ण 40 वर्षांखालील होते. मृतांमधील 9 जणांची अन्य आजारांबाबतची माहिती मिळाली नाही. उर्वरित 39 रुग्णांपैकी 28 जणांना (72 टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरूपाचे अतिजोखमीचे आजार होते. कोव्हिड-19 मुळे राज्यात आतापर्यंत 779 जण दगावले आहेत. 

थोडक्यात महत्त्वाचे

  • थ्रोट स्वॅब तपासणी : 2,27,804 
  • निगेटिव्ह : 2,06,481
  • पॉझिटिव्ह : 20,228 
  • क्लस्टर कंटेनमेंट झोन : 1243 
  • सर्वेक्षण पथके : 12,388
  • लोकसंख्येची पाहणी : 55 लाख    
  • कोरोनामुक्त : 3800
  • होम क्वारंटाईन : 2,41,290
  • संस्थात्मक क्वारंटाईन : 13,976

number of corona victims in the state today crossed one thousand, 48 people died in one day