आरटीईअंतर्गत आरक्षित जागांची संख्या घटली

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

पहिल्याच दिवशी १३०० प्रवेश अर्ज

मुंबई : बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क (आरटीई) कायद्यांतर्गत २५ टक्के आरक्षित जागांवरील प्रवेश प्रक्रियेसाठी महापालिका क्षेत्रातील शाळांची संख्या ११ ने वाढली असली, तरी उपलब्ध जागा २८९ ने कमी झाल्या आहेत. 

मोठी बातमी अशोक चव्हाण म्हणतात बाळासाहेब थोरातांना हटवा, सोनिया गांधीकडे तक्रार?  

गेल्या वर्षी ३५६ शाळांमध्ये ७ हजार ४९१ जागा होत्या; यंदा ३६७ शाळांमध्ये ७ हजार २०२ जागा उपलब्ध आहेत. आरटीई प्रवेशासाठी पहिल्याच दिवशी १ हजार ३०० विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत.

हे वाचलेय का... इथे आहे, सूर्याजी मालुसरे यांचे समाधिस्थळ...पाहा कसे आहे....

आरटीई प्रवेशाची नोंदणी शाळांनी पूर्ण केल्यानंतर बुधवारपासून (ता. १२) अर्ज भरण्यास सुरुवात झाली. आरटीई प्रवेशासाठी खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवल्या जातात; परंतु मागील वर्षीच्या तुलनेत यंदा अनेक शाळांनी पळवाट काढली असून, नोंदणीवर परिणाम झाला आहे. मुंबईत शाळांच्या संख्येत वाढ झाली असली, तरी महापालिका शाळांत मोठी घट झाल्याचे दिसून येते. 

महत्वाची बातमी नवी मुंबई काबीज करण्यासाठी शरद पवारांची मोठी खेळी, वाचा...

आरटीई प्रवेशांसाठी राज्यभरात एक लाख १५ हजार १९१ जागांची नोंदणी झाली असून, दोन दिवसांत १६ हजार ८०० पालकांनी अर्ज केले आहेत. अर्ज सादर करण्याची मुदत २९ फेब्रुवारीला समाप्त होईल. त्यानंतर ११ व १२ मार्चला सोडत काढली जाईल; यंदा एकदाच सोडत काढली जाणार आहे. त्यानंतर प्रतीक्षा यादीनुसार तीन टप्प्यांत प्रवेश दिले जाणार आहेत.

The number of reserved seats under RTE is reduced


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The number of reserved seats under RTE is reduced