देवेंद्र फडणवीस यांचा आक्षेप फेटाळला; विधिमंडळ अधिवेशन नियमानुसारच

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 नोव्हेंबर 2019

अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक पवित्रा घेतला. अधिवेशनच नियमाला धरून नसल्याचे सांगत त्यांनी अधिवेशन बोलवण्यावर आक्षेप नोंदवला.

मुंबई : विधिमंडळात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बहुमत चाचणीला सामोरे जात असताना, विधिमंडळाचे अधिवेशनच नियमबाह्य असल्याचा मुद्दा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात उपस्थित केला. पण, विधिमंडळाचे हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी त्यांचा हा आक्षेप फेटाळून लावला आणि अधिवेशन राज्यपालांच्या अनुमतीनेच घेण्यात येत आहे असे स्पष्ट केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक पवित्रा घेतला. अधिवेशनच नियमाला धरून नसल्याचे सांगत त्यांनी अधिवेशन बोलवण्यावर आक्षेप नोंदवला. सभागृहात एकदा राष्ट्रगीत झाल्यानंतर पुन्हा अधिवेशन सुरू करण्यासाठी राज्यपालांना विशेष सूचना द्यावी लागते. पण, भाजपचे आमदार सभागृहात पोहचू नयेत म्हणून रात्री एक वाजता भाजप आमदारांना अधिवेशनाचे निरोप देण्यात आले, असा मुद्दा फडणवीस यांनी सभागृहात उपस्थित केला. यावेळी भाजप सदस्यांनी गोंधळ घातला. त्यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्र्यांचा परिचय करून दिला. त्यानंतर फडणवीस यांनी पुन्हा त्याला आक्षेप घेतला. फडणवीस म्हणाले, 'मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी नियमानुसार शपथ घेतलेली नाही. नमुन्यानुसार शपथ घेतल्यानंतर ती गृहित धरली जाते. त्यामुळं सभागृहातील परिचय योग्य नाही. त्यामुळं मंत्र्यांचा परिचयही संविधानाला धरून नाही.

चंद्रकांत पाटील यांचं महाविकास आघाडीला 'ओपन चॅलेंज'

उद्धव यांना सभागृहात राज ठाकरेंचा पाठिंबा नाही; मनसे तटस्थ?

मंत्रिमंडळाने हंगामी हंगामी अध्यक्षांची निवड का रद्द केली? असा मुद्दाही फडणवीस यांनी उपस्थित केला. त्यावर हंगामी अध्यक्ष वळसे-पाटील यांनी सभागृहाबाहेर घडलेल्या घटनेवर काहीही भाष्य करू इच्छित नाही, असे स्पष्ट केले. ते म्हणाले, 'मंत्रिमंडळाला हंगामी अध्यक्ष नेमण्याचा अधिकार आहे. त्यात अधिकारावर राज्यपालांनी माझी हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: objection taking by Devendra Fadnavis rejected by speaker Dilip Valse Patil