esakal | धक्कादायक! मुंबईत आणखी एका पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू; एकाच कक्षातील सहा पोलिस बाधित
sakal

बोलून बातमी शोधा

covid

दिवसेंदिवस मुंबईतील कोरोनाचा संसर्ग वाढतच असून कोरोना योद्धेही कोरोनाच्या विळख्यात येत आहे. मुंबईत आतापर्यंत 2395 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 1667 पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे.

धक्कादायक! मुंबईत आणखी एका पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू; एकाच कक्षातील सहा पोलिस बाधित

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : दिवसेंदिवस मुंबईतील कोरोनाचा संसर्ग वाढतच असून कोरोना योद्धेही कोरोनाच्या विळख्यात येत आहे. मुंबईत आतापर्यंत 2395 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 1667 पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे कोरोनावर मात केलेल्या पोलिसांचा आकडे 65 टक्क्यांहून अधिक आहे. त्यातील 722 जण कर्तव्यावर पुन्हा रूजू झाले आहे. 282 पोलिस उपचारानंतर सध्या घरी आहेत, तर 663 पोलिस लवकरच कर्तव्यावर रूजू होणार आहेत.  

सौरव गांगुलीच्या कुटूंबापर्यंत पोहचला कोरोना; वाचा कोण कोण झाले बाधित...

दरम्यान, मुंबईत शनिवारी आणखी एका पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू आला असून त्यामुळे मुंबईतील मृत पोलिसांचा आकडा 32 वर पोहोचला आहे. विशेष शाखेत हवालदार लेखनिक असलेले 57 वर्षीय पोलिसाचा शनिवारी सकाळी कोरोनामुळे मृत्यू झाला. ते पोलिस आयुक्तालय वसाहतीत वास्तव्याला होते. त्यांच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी दोन मुलगे व एक मुगी असा परिवार आहे. 3 जूनला त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर 4 जूनला त्यांना  बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.

सुशांतसिंग आत्महत्या प्रकरण : सुशांतसोबतचे कॉन्ट्रॅक्ट यश राज फिल्म्सने पोलिसांकडे केले सुपूर्त...

कोरोनावरील उपचारासाठी मुंबईत पोलिसांसाठी चार कोविड केअर सेंटरची स्थापना करण्यात आली आहे. या कोविड केअर सेंटरमध्ये 452 पोलिस  उपचार घेत आहेत. तर 205 जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यता आले आहे. याशिवाय 35 पोलिसांना विलगीकरणार ठेवण्यात आले आहे. याशिवाय इतर प्रतिबंधात्मक साहित्य व औषधांचे वाटपही पोलिसांना करण्यात आले आहे. याशिवाय मुंबईत कार्यरत 82 राज्य राखीव पोलिस दलाच्या जवानांनाही आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. पाच अधिकारी व 77 जवानांचा समावेश आहे.

अरे बापरे..! राज्यात कोरोनाचा धोका वाढणार ? गुजरात, राजस्थानातून महाराष्ट्रात अवैध प्रवासी वाहतूक...

गुन्हे शाखेच्या सहा पोलिसांना कोरोनाची लागण
गुन्हे शाखेच्या एका कक्षातील सहा पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. या कक्षातील एका चालकाला कोरोना झाल्याचे 17 जूनला आलेल्या अहवालातून स्पष्ट झाले होते. त्यानंतर 11 अधिकारी व कर्मचारी विलगीकरणार गेले होते. त्यानंतर या कक्षातील सहाय्यक पोलिस निरीक्षकासह सहा जणांना कोरोना झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. 19 जूनला हे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील पोलिस अधिकाराऱ्यावर चर्नी रोड येथील सैफी रुग्णालयात, तर पाच पोलिसांवर वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर त्या चालकावर वांद्रे येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
.....
एका अधिकाऱ्याला कोरोनाची लागण
पूर्व मुंबईतील एका पोलिस ठाण्याचे प्रभारी असलेल्या अधिकाऱ्यालाही कोरोनाची लागण झाली आहे. आठवड्याभरापासून त्यांची तब्येत ठीक नव्हती. 18 जूनला त्यांना अहवाल प्राप्त झाला होता. त्यात त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्यावर सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत.