२०५० मध्ये 'एवढी' मुंबई जाणार पाण्याखाली; अफवा नाही धोक्याची घंटा...

२०५० मध्ये 'एवढी' मुंबई जाणार पाण्याखाली; अफवा नाही धोक्याची घंटा...

मुंबई : लवकरच जगबुडी होणार आहे, संपूर्ण जग पाण्याखाली जाणार आहे अशा अफवा आपण नेहमीच ऐकत आलो आहोत. मात्र मॅक्किन्से इंडियानं केलेल्या एका अभ्यासानुसार मुंबई शहर २०५० पर्यंत बुडणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. यामुळे यावेळी ही अफवा नाहीये तर मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा आहे. 

ग्लोबल वॉर्मिंगमुळे संपूर्ण जगाचं सरासरी तापमान वाढत चाललं आहे. मोठे बर्फाचे डोंगर वितळायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे महासागर आणि समुद्रांच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत चालली आहे. यामुळे जगातले अनेक देश संकटात आहेत. याचा परिणाम आता मुंबईवरी होणार आहे.

'मॅक्किन्से इंडिया' या कंपनीनं केलेल्या अभ्यासानुसार, २०५० पर्यंत मुंबईत पाणी तुंबण्याच्या आणि पूराच्या तीव्रतेत २५ टक्क्यांची वाढ होणार आहे. तसंच समुद्राच्या पातळीत ०.५  मीटर वाढ दिसून येणार आहे. त्यामुळे समुद्र किनारपट्टीच्या १ किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या २ ते ३ लाख लोकांवर याचा परिणाम होणार असल्याची शक्यता आहे. मॅक्किन्से इंडियानं याबद्दलची माहिती मुंबईत आयोजित 'क्लायमेट क्रायसिसः अ‍ॅक्शन फॉर ट्रॉपिकल कोस्टल सिटीज' नावाच्या परिषदेत दिली आहे.  

काय आहेत मॅक्किन्से इंडियाचे निष्कर्ष:

  • २०५० पर्यंत मुंबईत पाणी तुंबण्याच्या आणि पूराच्या तीव्रतेत २५ टक्क्यांची वाढ होणार आहे. तसंच समुद्राच्या पातळीत ०.५  मीटर वाढ दिसून येणार आहे.
  • १०० किलोटर  प्रतितास वाऱ्याच्या वेगानं या पातळीत तब्बल १.५ पट वाढ होणार आहे.
  • यामुळे मुंबईत पूराच्या तीव्रतेत २५ टक्क्यांनी वाढ होईल.
  • आता समुद्राची सरासरी खोली ०.४६ मीटर इतकी आहे. मात्र २०५० पर्यंत ही खोली ०.८ मीटर इतकी होईल.
  • सध्या ०.०५ मीटरपेक्षा जास्त पूर क्षेत्र ४६ टक्के आहे मात्र २०५० पर्यंत हे ६० टक्क्यांपर्यंत जाईल"
  • मॅक्किन्से इंडियाचे प्रमुख डॉ. शिरीष सांखे यांनी ही माहिती दिलीये. 
  • "मुंबई किनारपट्टी आता व्हिएतनाम आणि फ्लोरिडा या देशांच्या किनापट्टीसारखीच होत चालली आहे, त्यामुळे आपल्याला हवामान बदलावर लक्ष देण्याची जास्त गरज आहे"

जागतिक तापमान वाढीमुळे जगातल्या समुद्राच्या पाण्यात वाढ होत चालली आहे आता ही जागतिक तापमानवाढ कमी करण्यासाठी वेळीच पावलं उचलली नाही तर मुंबईला बुडण्यापासून कोणीही वाचवू शकणार नाही हे निश्चित.    

one more survey states that mumbai will sink by 2050

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com