आत्महत्येची भिती दाखवून तो करत होता तरुणीचा मानसिक छळ..

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 मार्च 2020

एकतर्फी प्रेमवीरास अटक

मुंबई : एका तरुणीला मोबाईलवरून सतत कॉल करून तिचा मानसिक छळ करणाऱ्या माथेफिरूला वनराई पोलिसांनी अटक केली. धर्मेंद्र चौधरी असे या आरोपीचे नाव असून, अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. तरुणाला आत्महत्या करणे भाग पाडल्याच्या गुन्ह्यात तिला अटकेची भीती दाखवण्यासाठी त्याने दिल्ली पोलिसांच्या नावाचा गैरवापर केला होता. 

#COVID19 : घाबरू नका! करोनाला निष्प्रभ करण्यासाठी प्रयत्न सुरू...

गोरेगाव परिसरात राहणारी ही 23 वर्षांची तरुणी एका कुरिअर कंपनीत वरिष्ठ अधिकारी होती. तेथे अन्य विभागात काम करणाऱ्या धर्मेंद्र चौधरी याचे तिच्यावर एकतर्फी प्रेम होते. अनेकदा तो तिला कार्यालयात व वेगवेगळ्या मोबाईलवरून दूरध्वनी करून त्रास देत होता. याबाबत तिने समजावल्यानंतरही त्याने असा त्रास देणे सुरूच ठेवले होते.

सावधान ! महाराष्ट्रात एका दिवसात वाढलेत ११ कोरोना रुग्ण; अजूनही बाहेर पडत असाल तर आत्ताच थांबा..

तिच्या घरच्या पत्त्यावर त्याने महागड्या भेटवस्तू पाठवल्या होत्या. तिने वरिष्ठांना ही माहिती दिल्यावर त्याला कामावरून काढून टाकण्यात आले होते. काही महिन्यांनंतर तिनेही या कुरिअर कंपनीतील नोकरी सोडली होती. 
चौधरीने मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये तिच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला. दिल्ली पोलिस दलातील अधिकारी असल्याचे भासवून, त्याने धर्मेंद्र नावाच्या आत्महत्या केलेल्या तरुणाने सुसाईड नोटमध्ये तिचे नाव लिहिल्याचे सांगितले.

आणखी एक गंभीर घटना, उल्हासनगरमधील 'ती' कोरोना पॉझिटिव्ह महिला गेली होती सत्संगला, तिथं होती १५०० लोकं

या तरुणाच्या आत्महत्येला कारणीभूत असल्यामुळे तिच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची धमकी त्याने दिली. त्यामुळे घाबरलेल्या या तरुणीने एका मित्राला ही माहिती दिली. त्यानंतर त्यांनी वनराई पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी तपास केला असता हा प्रकार धर्मेंद्र चौधरी याने केल्याचे उघड झाले. त्यावरून पोलिसांनी त्याला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.

One-sided lover arrested for mental harassment of a girl


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One-sided lover arrested for mental harassment of a girl