esakal | वसईत अवघे १३ टक्के लसीकरण
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai

वसईत अवघे १३ टक्के लसीकरण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

विरार : वसई-विरार (Vasai-Virar) पालिका क्षेत्रातून कोरोनाची (Corona) दुसरी लाट आता ओसरत असल्याचे चित्र आहे. मात्र शहरातील (City) बहुसंख्य लसीकरण केंद्रे बंद असल्याने पुन्हा कोरोनाचा (corona) उद्रेक झाल्यास पालिका क्षेत्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या कचाट्यात सापडण्याची लक्षणे दिसत आहेत. पालिका (Minicipal) क्षेत्रात जवळपास २५ लाख नागरिक असताना आतापर्यंत अवघ्या ३ लाख १६ हजार १२० नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

शहरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातल्यानंतर मोफत लसीकरण केंद्रे वाढवून त्यांची संख्या ५० पर्यंत प्रशासनाने नेली. त्यानंतर कोरोनाचा कहर कमी झाल्यानंतर जुलै महिन्याच्या मध्यावर फक्त एक-दोन केंद्रे वगळता सर्व केंद्रे बंद केली. त्यामुळे आधीच लसीकरणाची टक्केवारी फक्त १३ टक्क्यांच्या आसपास असल्याने अनेक नागरिक लशीपासून वंचित राहिले आहेत. दुसऱ्या डोसची तीन महिन्यांची मुदत उलटूनही काहींना दुसरा डोस मिळाला नसल्याने तेही भीतीच्या छायेत आहेत. तिसरी लाट थोपविण्यासाठी लसीकरण वाढविणे आवश्यक असताना मोफत लस बंद करून विकतच्या, खासगी लसीकरणाला पालिका प्रोत्साहन देत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. सद्यस्थितीत २५ लाख लोकसंख्या असलेल्या वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या हद्दीत केवळ ३ लाख नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित २२ लाखांहून अधिक नागरिक लसीकरणाच्या प्रतीक्षेत आहेत.

हेही वाचा: नाशिक : 'कोयता गॅंग'ची दिवसाढवळ्या दहशत! नागरिक भयभीत

लोकप्रतिनिधी गायब

वसई-विरारमधील नागरिक मोठ्या प्रमाणात लसीकरणापासून वंचित आहेत. या सगळ्यामध्ये पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गायब आहेत; तर खासदार फक्त आढावा बैठकीत दिसतात. तसेच स्थानिक आमदार मात्र सरकारला निवेदने देण्यात व्यग्र असल्याने नागरिकांना कोणीही वाली राहिला नसल्याची टीका करण्यात येत आहे.

loading image
go to top