काय सांगता? 'या' जिल्ह्यात एकही तालुका नाही? जाणून घ्या तो जिल्हा आहे तरी कोणता ?

काय सांगता? 'या' जिल्ह्यात एकही तालुका नाही? जाणून घ्या तो जिल्हा आहे तरी कोणता ?

मुंबई : महाराष्ट्र म्हटलं की डोळ्यासमोर महाराष्ट्राचा इतिहास उभा राहतो. महाराष्ट्राच्या यशोगाथा सांगणारे अनेक किस्से कानावर पडल्याचे जाणवते. भारतातील सर्व राज्यांपैकी महाराष्ट्राची ओळख वेगळी आहे. औद्योगिक विकास असो व तंत्रज्ञान महाराष्ट्र प्रगतशील आहे. अनेक लहान मोठे उद्योग समूह इथे आहेत. महाराष्ट्रात ३६ जिल्हयाचं ही वेगळेपण महाराष्ट्राला लाभले आहे. अनेक वैशिष्ट्यपूर्ण जिल्हे महाराष्ट्रात आहेत. त्यापैकी मुंबई शहर असा जिल्हा आहे की, तिथे एकही तालुका नाही. सात बेटांच्या समूहाने मुंबई शहर तयार झाले असून १९९० साली मुंबईची विभागणी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर अशी करण्यात आली. महाराष्ट्राची राजधानी म्हणून आपण मुंबई शहराला ओळखतो. मात्र मुंबई हे जीवन जगायला शिकवणारी 'जादुई नगरी' म्हणून ही ओळखली जाते. मुंबई शहर हे तिन्ही बाजूंनी पाण्याने वेढलेले आहे.

आपण ज्या भागात राहतो म्हणजे ज्या राज्यात आपले वास्तव्य आहे. तिथल्या राहाणीमानाची, तिथल्या संस्कृतीची, आसपासच्या लोकांची आपल्याला एक सवय होते आणि आपसुकच आपण त्या वातावरणाचा एक भाग कधी बनुन जातो ते कळत सुध्दा नाही. महाराष्ट्र राज्य देखील त्याच्या वेगळेपणामुळे आणि ब-याच वैशिष्टयांमुळे भारतातील लोकप्रिय राज्य आहे.

महाराष्ट्र हे भारतातील सर्वात विकसनशील राज्यांपैकी एक आहे. महाराष्ट्रात एकूण ३६ जिल्हे आहेत तर ३५८ तालुके आहेत. राज्यातील असे काही भाग, जिल्हे आहेत की ते त्या त्या गोष्टींकरता खुपच लोकप्रिय आणि आर्थिक बाजारपेठा मिळवणारे झाले आहेत. अनेकांच्या माहितीनुसार प्रत्येक जिल्ह्यात अनेक तालुके असतातच. त्या तालुक्यात अनेक लहान मोठी गावे ही वास्तव्यास असतात. आणि त्यांचे एक ना अनेक वैशिष्ट्येही असतात. परंतु महाराष्ट्रातील मुंबई शहरात एकही तालुका नाही. कारण मुंबईचे विभाजन करण्यात आले असून नवी मुंबई, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर असे तीन भाग करण्यात आले आहेत. या विभाजनानंतर मुंबई शहरातील तालुक्यांची विभागणी नवी मुंबई आणि मुंबई उपनगरात करण्यात आली. तसेच मुंबई एक विस्तृत क्षेत्रफळ असणारा भाग आहे. त्यामुळे  महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यामधून मुंबई शहरात एकही तालुका नाही. मुंबई हे महाराष्ट्राच्या राजधानीचे शहर आहे. देशातील सर्वाधिक लोकसंख्येचे हे शहर आहे. तसेच जगातील सर्वा‍धिक लोकसंख्येच्या शहरांच्या क्रमवारीत हे आठवे शहर आहे. देशाच्या मध्यम-पश्चिमी किनारपट्टीवर अरबी समुद्रालगत मुंबई वसलेली आहे. मुंबई सात द्वीपकल्प जोडून तयार करण्यात आलेले शहर आहे. शहराचा मुख्य‍ भाग दक्षिणेकडे नख्यासारख्या दिसणाऱ्या द्विपकल्पाकडे आहे. मुंबई शहराचे मुख्यालय ओल्ड कस्ट्म हाउस येथे आहे. औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्र राज्य आज अव्व्वल स्थानावर आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागाचा वेगवेगळा इतिहास आहे. 

महाराष्ट्र भौगोलिक, आर्थिक, धार्मिक आणि ऐतिहासिक अशा सर्व दृष्टीने परिपूर्ण आहे.
अनुकुल वातावरण, भरपुर मोठे क्षेत्रफळ, सोयीची बाजारपेठ, आवश्यक गोष्टींची उपलब्धता, शैक्षणिकदृष्टया सक्षम असा हा आपला 'महाराष्ट्र' आहे. 

महाराष्ट्रातील जिल्हे आणि तेथील तालुक्यांची आकडेवारी

जिल्हा.         तालुक्यांची आकडेवारी
- अहमदनगर        - १४
- अकोला             - ०७
- अमरावती          - १४
- औरंगाबाद         - ०९
-  बीड                - ११
- भंडारा              - ०७
-  बुलढाणा         - १३
-  चंद्रपूर             - १५
- धुळे                 - ०४
-  गडचिरोली      - १२
- गोंदिया            - ०८
-  हिंगोली           - ०५
- जळगाव           - १५
- जालना             - ०८
- कोल्हापूर          - १२
-  लातूर               - ०९
-  मुंबई उपनगर    - ०३
- मुंबई शहर         - एकही तालुका नाही
- ठाणे                - ०७
- नागपूर             - १४
- नांदेड               - १६
- नंदुरबार           - ०६
-  नाशिक           - १५

तयारीला लागा ! 'या' दिवशी मुंबईत दाखल होणार पाऊस, हवामान खात्याचा अंदाज...
-  उस्मानाबाद     - ०८
- परभणी           - ०९
-  पुणे                - १४
- रायगड.           - १५
- रत्नागिरी          - ०९
- सांगली             - १०
- सातारा             - ११
- सिंधुदुर्ग            - ०८
- सोलापूर           - ११
- वर्धा                 - ०८
- वाशिम             - ०६
- यवतमाळ          - १६
- पालघर             - ०८

this is the only district which do not have any taluka place read interesting news 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com