मुंबईतील पूरनियंत्रणासाठी 'हा' पॅटर्न ठरणार उपयोगी?; महापालिका करतेय विचार

संजय घारपुरे
Sunday, 9 August 2020

त्यावेळी जपानमधील तज्ज्ञही आले होते. एवढेच नव्हे तर जपानमधील कंपनीच यासाठी अर्थसाह्य करण्याचा विचारही केला होता. त्यानंतर अर्थसंकल्पात पाच कोटीची तरतूदही करण्यात आली.

मुंबई : भरपूर पाऊस पडला म्हणून मुंबईत पाणी साचले, हे आता नित्याचेच झाले आहे. मुंबईत जोरदार पाऊस आल्यास आणि त्याचवेळी समुद्रास उधाण असल्यास मुंबईची तुंबई होतेच. जोपर्यंत समुद्राची भरती कमी होत नाही, तोपर्यंत मुंबईतील साचलेल्या पाण्याचा निचरा कमी होत नाही. मुंबईत पावसाचे साचणाऱ्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा मुंबई महापालिका अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहे. मुंबईत पडणारे  पावसाचे पाणी जमिनीखाली साठवले तर...? मुंबई महापालिकेने गतवर्षी या प्रस्तावाचा विचार केला आणि त्यासाठी माफक तरतूदही केली आहे. 

गणेशोत्सवासाठी मुंबईतून गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी 'ही' आनंदाची बातमी, नक्की वाचा

मुंबईत खूप कमी कालावधीत भरपूर पाऊस पडतो आणि त्यामुळे मुंबईतील पाणी वाहून जाण्याच्या व्यवस्थेचा पूर्ण कस लागतो. सध्याची व्यवस्था तासाला 50 मिलीमीटर पाण्याचा निचरा करु शकते. आता हे अतिरीक्त पाणी साठवण्याच्या जागेची मुंबईला गरज असल्याचे वृत्त आहे. टोकियोतील पूराच्या पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था तसेच दक्षिण कोरियातील जमिनीखालील तळ्यांच्या संकल्पनेचा विचार करुन मुंबईत या प्रकारची व्यवस्था तयार करण्याचा विचार होत आहे. 

मुंबईकर, जाणून घ्या तुमच्या शहरातील कोरोनाची परिस्थिती

बदलत्या हवामानामुळे काही तासात भरपूर पाऊस होण्याचे दिवस भविष्यात वाढणार आहेत. आता यासाठी पाणी निचरा होणाऱ्या यंत्रणेवरील ताण कमी करण्याचा विचार होत आहे. आता हे पूरस्थिती निर्माण करणारे पाणी जमिनीखाली साठवले आणि पाऊस थांबवल्यावर तेच समुद्रात सोडले किंवा पुनर्वापर केला तर पूर येणार नाही. हे तांत्रिकदृष्ट्या फारसे अवघड नाही. याबाबत प्रशासन विचार करीत आहोत. यासंदर्भात  चर्चाही केल्याचे मुंबई महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

राज्यातील इतर 300 गडकोट-किल्ले संवर्धनाची जबाबदारी कोणाची? वाचा कोणत्या संघटनेने विचारला हा महत्वपुर्ण सवाल

दक्षिण मुंबईत 5 ऑगस्टला 46 वर्षातील एका दिवसातील सर्वाधिक पाऊस झाला. त्यामुळे या परिसरातील अनेक भागात प्रथमच पाणी साचले. जमिनीखाली तळी तयार करण्याचा खर्च खूप जास्त असेल, पण शहराबाबत दूरगामी विचार करावाच लागेल. यापूर्वीच पवई आणि विहार तलावातून मिठी नदीत जाणारे पाणी साठवून ठेवण्यासाठी तळी बांधण्याचे ठरवले आहे. त्यासाठी सल्लागार नेमण्यासाठी निविदाही काढण्यात आली आहे.

लॉकडाऊनमुळे विणकामगार उपाशी; उत्सवच बंद असल्याने दोऱ्या विकणार कुणाला?

गतवर्षी तत्कालीन महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी हे पाणी साठवण्याचा विचार केला होता. त्यावेळी जपानमधील तज्ज्ञही आले होते. एवढेच नव्हे तर जपानमधील कंपनीच यासाठी अर्थसाह्य करण्याचा विचारही केला होता. त्यानंतर अर्थसंकल्पात पाच कोटीची तरतूदही करण्यात आली, पण त्यानंतर पुढे काही घडले नाही.
---
संपादन : ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: to overcome problem of waterlogging in mumbai, bmc thinks on new pattern