
कासा पोलिस स्टेशनचे तत्कालीन प्रभारी अधिकारी आनंदराव काळे यांना पोलिस विभागातून बडतर्फ करण्यात आल्याची माहिती समजतंय.
पालघर साधू हत्याकांड प्रकरणः तत्कालीन प्रभारी अधिकारी आनंदराव काळे बडतर्फ
मुंबईः पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे झालेल्या साधूंच्या हत्याकांड प्रकरणी मोठी अपडेट समोर येत आहे. कासा पोलिस स्टेशनचे तत्कालीन प्रभारी अधिकारी आनंदराव काळे यांना पोलिस विभागातून बडतर्फ करण्यात आल्याची माहिती समजतंय. १६ एप्रिल २०२० ला मुंबईहून सुरतकडे निघालेले दोन साधू आणि त्यांच्या वाहनचालकाची गडचिंचले गावातील वन विभागाच्या चौकीसमोर निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यानंतर हे प्रकरण बरंच चिघळलं होतं.
त्यानंतर सुरुवातीला याप्रकरणी कासा पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आनंदराव काळे, उपनिरीक्षक सुधीर कटारे, सहाय्यक फौजदार आर. बी. साळुंखे आणि दोन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. ही कारवाई केल्यानंतर पालघरचे तत्कालीन पोलिस अधीक्षक गौरव सिंग यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं होतं.
हेही वाचाः मुंबईकरांसाठी अनंत चतुर्दशीच्या दिवशी BMC चे मेगा नियोजन; जाणून घ्या विसर्जनाची नियमावली आणि स्थळे
या प्रकरणानंतर गृहमंत्री अनिल देशमुख स्वतः पालघरला गेले होते. त्यानंतर गृहमंत्र्यांच्या भेटीनंतर कासा पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या ३५ पोलिस कर्मचाऱ्यांची जिल्ह्यात अन्य ठिकाणी बदली केली होती.
अधिक वाचाः मुंबईत आज जोरदार पावसाची शक्यता; तर ऑगस्टमध्ये सरासरी 'इतक्या' पावसाची नोंद
दरम्यान या प्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागानं दाखल केलेल्या तीन तक्रारींमध्ये स्वतंत्रपणे दोषारोपपत्र दाखल केलंय. तसंच यावरची सुनावणी ठाणे येथील विशेष न्यायालयात होतं आहे.
हेही वाचाः घराच्या प्रतिक्षेत अनेकांनी डोळे मिटले, कित्येकांनी मुंबई सोडली; आतातरी मूळ घरात जाऊ द्या!
याप्रकरणी विभागीय चौकशीही करण्यात येत होती. चौकशीअंती कासा पोलीस स्टेशनचे तत्कालीन प्रभारी अधिकारी सहाय्यक निरीक्षक आनंदराव काळे यांना पोलिस विभागातून बडतर्फ करण्यात आलं.
(संपादनः पूजा विचारे)
Palghar mob lynching case assistant police inspector Anandrao Kale dismissed
Web Title: Palghar Mob Lynching Case Assistant Police Inspector Anandrao Kale Dismissed
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..