

Navi Mumbai Airport
ESakal
पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यान्वित होण्याच्या पार्श्वभूमीवर पनवेल परिसरातील कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यासाठी पनवेल महापालिकेने पुढाकार घेतला आहे. विमानतळाच्या दिशेने जाणाऱ्या रहदारीचा वाढता ताण लक्षात घेता गाढी नदीवर नवीन पूल उभारण्याच्या महत्त्वाच्या प्रस्तावाला प्रशासकीय महासभेत मंजुरी देण्यात आली.