अजित पवारांना क्लिनचीट देणारे 'हे' आहेत मुंबई पोलिसांचे नवे बॉस

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 29 February 2020

मुंबई शहर. देशाची आर्थिक राजधानी. देशातील अनेक बड्या उद्योगपतीचं राहण्याचं शहर. मुंबई कधी झोपत नाही असं देखील म्हणतात. देशातील सर्वात महत्त्वाच्या शहरातील पोलिसांच्या बॉस ची निवड करण्यात आलीये. मुंबईचे पोलिस आयुक्त संजय बर्वे सेवानिवृत्त होत असल्यामुळे मुंबई पोलिस आयुक्तपदी कुणाची वर्णी लागणार असा प्रश्न सर्वानाच पडला होता. मात्र आज मुंबईचे नवे पोलिस आयुक्त म्हणून १९८८ च्या तुकडीतले IPS अधिकारी परमबीर सिंह यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारने परिपत्रक काढत याबाबत माहिती दिली आहे. 

मोठी बातमी - समोरच्याला समजू न देता असे वाचा #WhatsApp वरचे मेसेज...

आयुक्त संजय बर्वे यांना मुदतवाढ दिली जाणार अशी चर्चा रंगली होती.  मात्र त्यांना मुदतवाढ दिली जाणार नाही असं राज्यसरकारकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. नायगाव पोलीस मुख्यालयात बर्वे यांच्या निरोप समारंभाची तयारीही सुरू करण्यात आली होती. यानंतर तब्बल १२ अधिकाऱ्यांच्या नावांची चर्चा पोलिस आयुक्त पदासाठी होती. मात्र आता मुंबईचे पोलिस आयुक्त म्हणून परमबीर सिंह यांची निवड करण्यात आली आहे. याआधी परमबीर सिंह हे महाराष्ट्र पोलिस विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक होते.

मोठी बातमी -  तिला दुकानातून सामान घेण्यासाठी बोलावले आणि दाराची कडी लावली...

कोण आहेत परमबीर सिंह:

  • परमबीर सिंह हे १९८८ च्या तुकडीतले IPS अधिकारी आहेत.
  • याआधी ते मुंबई क्राईम ब्रांचचे DCP म्हणून कार्यरत होते.
  • त्यानंतर ते दहशतवादीविरोधी पथकात मोठ्या पदावर होते.
  • परमबीर सिंह यांनी ठाणे पोलिस आयुक्तपदाची जवाबदारी पार पाडली होती.
  • मुंबईचे पोलिस आयुक्त म्हणून  निवड होण्याआधी परमबीर सिंह महाराष्ट्र पोलिस विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक होते.
  • विशेष म्हणजे अरुण गवळीच्या ठिकाणांवर धाड टाकण्यात त्यांचा मोठा हात होता.  
  • सिंचन घोटाळ्यात अजित पवार यांना क्लिनचीट देणारे परमबीर सिंह  हेच अधिकारी आहेत.

मोठी बातमी -  झालं असं काही..! पाचशे कोटींची विक्रमी कमाई!

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्या सरकारच्या काळात झालेल्या ७० हजार कोटींच्या  कथित 'सिंचनघोटाळ्यात' अजित पवार यांच्यावर आरोप करण्यात आले होते. यात परमबीर सिंह यांनी पहिल्यांदा अजित पवारांना क्लीनचिट दिली होती. 

मुंबईच्या पोलिस आयुक्त पदासाठी अनेक नावांची चर्चा होती. मात्र यात परमबीर सिंह यांनी बाजी मारली आहे. त्यामुळे आता या पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर परमबीर सिंह ही जवाबदारी कशी पार पाडतात हे बघणं महत्वाचं असणार आहे.  

Parambir singh appointed as new Commissioner of mumbai   

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parambir singh appointed as new Commissioner of mumbai