esakal | भाईंदर : गॅस संपल्याने मृतदेहावर अर्धवट अंत्यसंस्कार
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

भाईंदर : गॅस संपल्याने मृतदेहावर अर्धवट अंत्यसंस्कार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

भाईंदर : भाईंदर (Bhayandar) पश्चिम येथील स्मशानभुमीतील गॅस (Gas) शवदाहिनीमधील गॅस अचानक संपुष्टात आल्याने मृतदेहावर (Death body) अंअर्धवट अंत्यसंस्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यानंतर तब्बल तीन दिवसांनी गॅस (Gas) भरण्यात आल्यानंतर त्या मृतदेहावर (Death body) अंत्यसंस्कार होऊ शकले.

भाईंदर पश्चिम येथील स्मशानभुमीमध्ये शनिवारी रात्री एका मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आला होता. नातेवाईकांना गॅस शवदाहिनीवर अंत्यसंस्कार करायचे असल्याने मृतदेह गॅस शवदाहिनीत ठेवण्यात आला. शवदाहिनीचे यंत्र सुरु असताना ते अचानक बंद पडले त्यावेळी गॅस पुरवठा बंद झाला असल्याचे कर्मचार्‍याच्या लक्षात आले. परंतू गॅसचा पुरवठा करणारे सिलेंडर रिकामे झाले असल्यामुळे त्यादिवशी पूर्ण अंत्यसंस्कार होऊ शकले नाही. परिणामी मृतदेह अर्धवट अंत्यसंस्कार झालेल्या स्थितीत तीन दिवस गॅस शवदाहिनीमध्येच पडून होता अशी धक्कादायक माहिती सूत्रांनी दिली. अखेर तीन दिवसांनी सिलेंडरमध्ये गॅस रिफिल केल्यानंतर बुधवारी रात्री शवदाहिनी सुरु करुन अंत्यसंस्कार पूर्ण करण्यात आले.

हेही वाचा: गणेशोत्सवानिमित्त पश्चिम, कोकण रेल्वेवरून विशेष गाड्या; वाचा सविस्तर

या शवदाहिनीला गॅस पुरवठा करणारे सिलेंडर रिफील करण्यासाठी महापालिकेने कंत्राट दिले आहे. त्यामुळे यात नेमका हलगर्जीपणा कोणाचा हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. दरम्यान पर्यावरण पूरक या गॅस शवदाहिनीचा कोरोना काळ वगळता फारसा उपयोग होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मृतांचे नातेवाईक शवदाहिनी ऐवजी लाकडावरच अंत्यसंस्कार करण्यास प्राधान्य देत आहेत. त्यामुळे शवदाहिनीवर होत असलेला लाखो रुपयांचा खर्च वाया जात आहे. ही गॅस शवदाहिनी अनेकवेळा नादुरुस्त होत असल्याच्याही तक्रारी आहेत.

हेही वाचा: पश्चिम बंगालमध्ये ममतांचीच हवा; BJP आमदाराचा 'तृणमूल'मध्ये प्रवेश

गॅस पुरवठा करण्याचे कंत्राट संपुष्टात आले आहे. महापालिकेने आता त्यासाठी आवश्यक असलेले पैसे भरले आहेत. घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी शवदाहिनीला पाईपद्वारे गॅस पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

- दीपक खांबित, कार्यकारी अभियंता, मिरा भाईंदर महानगरपालिका

loading image
go to top