
मुंबई: आगीत भाजलेल्या रुग्णांना भविष्यात पालिकेच्या केईएम रुग्णालयात संसर्गमुक्त उपचार मिळणार आहेत. रुग्णालयाने प्लास्टिक सर्जरी वॉर्ड सुधारण्याचे काम सुरू केले आहे. एअर हँडलिंग युनिटच्या मदतीने वॉर्डातील संसर्गाची शक्यता आता नगण्य प्रमाणात कमी होणार असून, यासोबतच वॉर्डातील आगीत दगावलेल्या पुरुषांवरही लवकरच उपचार होणार आहेत.