डोंबिवलीकरांच्या उखडलेल्या पेव्हरब्लॉकवरून उड्या; स्थानक रस्त्याची दैना

डोंबिवलीकरांच्या उखडलेल्या पेव्हरब्लॉकवरून उड्या; स्थानक रस्त्याची दैना

ठाणे : डोंबिवली पूर्वेतील रेल्वेस्थानकाबाहेर रस्त्यावरील पेव्हरब्लॉक जागोजागी उखडले आहेत. यामुळे या रस्त्यावरून ये-जा करताना वाहनचालकांना, पादचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागते. काहीवेळा नागरिकांना चक्क उड्या मारून खड्डे चुकवावे लागतात. पालिका क्षेत्रातील रस्ते सुस्थितीत राहावेत, यासाठी प्रशासनाच्या वतीने देखभाल दुरुस्ती करण्यात येते, असा दावा प्रशासन करीत असले, तरी गेले कित्येक महिने या रस्त्याची झालेली दुरवस्था असून, डागडुजी कधी होणार, असा सवाल प्रवासी करीत आहेत. 

पूर्वेतील स्टेशन परिसरातील रस्त्यावर पेव्हर ब्लॉक लावण्यात आले आहेत. मात्र, ठिकठिकाणी हे पेव्हरब्लॉक उखडल्याने वाहनचालक, पादचाऱ्यांनाही अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. काहींना खड्ड्यांवरून उड्या मारून मार्गक्रमण करावे लागतो. काही ठिकाणी पेव्हरब्लॉकवर पाय दिल्यास त्यातील चिखल पायावर उडते. काही पादचाऱ्यांचे पाय मुरगळण्याचे प्रकारही घडत आहेत. 

रस्त्यावरील खड्डे हे पावसाळ्यापूर्वी डांबरीकरणाने, पावसाळ्याच्या कालावधीत खडीकरणाने, काही प्रमाणात कोल्ड मिक्‍सने आणि पावसाळ्यानंतर पुन्हा डांबरीकरणाने भरण्यात येतात, असा दावा पालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येतो; परंतु पालिका हद्दीत कुठेही ही कामे होताना दिसत नाहीत.

पावसाळ्यात शहरातील अनेक अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. डोंबिवली स्टेशन रस्ता हा मुख्य रस्ता असून त्याची गेले कित्येक महिने दुरवस्था असल्याने प्रवासी हैराण झाले आहेत. किमान ज्या भागातील पेव्हरब्लॉक निखळलेत, त्यांची डागडुजी तरी प्रशासनाने करावी, अशी मागणी प्रवासी करीत आहेत. 

स्थानक रस्त्यावरील पेव्हरब्लॉक ठिकठिकाणी निघाले आहेत. पावसाळ्यात याठिकाणी मोठ्या प्रमाणात चिखल होतो. वाहने जाताना पादचाऱ्यांच्या अंगावर पाणी उडते. त्यामुळे प्रशासनाने डागडुजी करून पादचाऱ्यांची वाट सुकर करावी. 
- मिनल टोके, प्रवासी 

शहरातील सर्वच रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत. प्रशासन दावा करत असले तरी वस्तूस्थिती वेगळी आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांतील खडी निघू नये किंवा काही वेगळ्या उपाययोजना करण्याचा विचार प्रशासनाने केला पाहिजे. 
- करण सातपुते, प्रवासी 

-------------------------
(संपादन : प्रणीत पवार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com