esakal | विजेची थकबाकी भरा, तात्पुरती जोडणी घ्या
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

विजेची थकबाकी भरा, तात्पुरती जोडणी घ्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

खारघर : गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळाकडे मागील वर्षाची थकीत वीजबिल (Lightbill) असेल, ते भरणा करून उत्सवासाठी तात्पुरता जोडणीसाठी अर्ज करावी, असे आवाहन खारघरच्या (Khargar) महावितरणकडून (MSEB) करण्यात आले आहे.

खारघर परिसरात राजकीय, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध मंडळांकडून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. गणेशोत्सवासाठी लागणारी तात्पुरता स्वरूपाची वीज जोडणी महावितरणकडून दिली जाते. त्यासाठी काही आगाऊ रक्कम घेतली जाते. मात्र उत्सव पार पडल्यावर उत्सवाच्या वेळी किती वीज वापरली, बिल किती झाले. याकडे मंडळाकडून दुर्लक्ष केला जाते. गणेश उत्सव येताच मंडळाचे पदाधिकारी जागे होतात आणि वीज जोडणीची मागणी करतात. त्यामुळे खारघर महावितरण विभागाने सावध भूमिका घेत, गणेश मंडळाने मागील थकबाकी बाबत महावितरण उपविभागीय कार्यालयात चौकशी करावी व ती त्वरित भरून नवीनतात्पुरता वीज पुरवठ्यासाठी अर्ज द्यावे.

हेही वाचा: खारघरच्या हवेवर लक्ष; गुणवत्ता तपासणी यंत्रणा लवकरच 

खारघरच्या महावितरण कार्यालयात याप्रकरणी विचारणा केली असता, खारघरमधील काही मंडळांकडे मागील वर्षाची वीजबिल थकीत आहे. त्यामुळे गणेश विसर्जन मंडळाने खारघरच्या कार्यालयात मागील वर्षीच्या गणेशोत्सवाच्या वेळी भरलेली आगाऊ रक्कम उत्सवाच्या वेळी वापरलेली वीज आणि आलेले वीजबिल यांची परिपूर्ण माहिती घ्यावी आणि येणाऱ्या गणेश उत्सवासाठी लागणारी तात्पुरत्या वीज जोडणीची मागणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा: औरंगाबादेत वीजबिल वसुली जोरात

बिल भरण्याकडे दुर्लक्ष सार्वजनिक गणेश मंडळांकडून अनेकदा बेकायदा वीज घेतली जाते. परवानगी घेतात. मात्र उत्सव संपताच अशा मंडळांवर महावितरणची करडी नजर राहणार आहे. काही मंडळे वीज बिल भरण्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे यंदा थकबाकी भरा, आणि तमपुरती वीजजोडणी करून घेण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे

loading image
go to top