कळंबोली वसाहत पदपथावर फेरीवाले

रस्त्याच्या दुतर्फा अवैद्य पार्किंग पादचारी जिव मुठीत धरून रस्त्यावर
Mumbai
MumbaiSakal

नवीन पनवेल : १८ कळंबोली (Kalamboli) वसाहती मधील मध्यवर्ती ठिकाणच्या मुख्य रस्त्याला असलेले पदपथ (Footpath) फेरीवाल्यांनी बस्तान बसवले आहे. त्यामुळे पादचार्यांना मुख्य रस्त्यावरून जिव मुठीत धरून चालावे लागत आहे.

कळंबोली मधील मेन बाजारपेठ असलेल्या केल २ नाका ते सुधागड शाळेच्या रस्त्याच्या कडेला असलेले पदपथ फेरीवाल्यांनी आधीच गिळंकृत केलेले होते. फेरीवाल्यांनी आता आपले बस्तान केल २ नाका ते सेंट जोसेफ हायस्कूल च्या रस्त्यालगतच्या पदपथावर बसवले आहे. कळंबोली वसाहती मध्ये पार्किंग साठी एकही वाहनतळ नसल्यामुळे येथील नागरिक आपली वाहने रस्त्याच्या कडेला उभी करत आहेत.सिडको ने वसवलेल्या वसाहती मध्ये अल्प उत्पादन गटातील सोसायट्यांचे प्रमाण जास्त असल्याने पार्किंग ची सुविधा नाही. त्यामुळे नागरिकांना आपली वाहने रस्त्या च्या कडेला लावावी लागत असल्याने वसाहती मधील अर्धा रस्ता या अनधिकृत पार्किंग ने गिळंकृत केला आहे.त्यामुळे पादचार्यांना चालण्यासाठी जागाच उरली नसल्यामुळे पादचार्यांची गैरसोय होत आहे.

Mumbai
Video - कोरोना नाहीच; त्यामुळे मरणारे जगण्याच्या लायक नाहीत; संभाजी भिडेंचे वादग्रस्त वक्तव्य

या परिसरात सिडको ने तिन ठिकाणी बाजारतळ उभारले आहेत. तरीही फेरीवाले पदपथावर दुकाने लावून माल विकताना दिसत आहेत. कळंबोली वसाहती मध्ये सायन पनवेल महामार्गा पासून सिडको ऑफिस ते रोडपाली पल्लवी हाॅटेल पर्यंत च्या रस्त्या लगत दोन्ही बाजूने दुचाकी व चारचाकी वाहने कायम स्वरूपी उभी असतात. याच मार्गावर करावली चौक ते एसबीआय बॅंक चौका पर्यंत पार्क केलेल्या वाहनांच्या बाहेर अर्ध्या रस्त्यावर फेरीवाले माल विक्रीसाठी बसतात त्यामुळे या परिसरात रहदारी ला नेहमी अडथळा येत असतो. कोरोना चे निर्बंध क्षितील झाले असून सणासुदीचे दिवस असल्याने येथील नागरिक मोठ्या प्रमाणावर बाहेर पडत असल्याने येथील बेशिस्त पार्किंग व फेरीवाल्यावर कारवाई करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

Mumbai
पुणे स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी;पाहा व्हिडिओ
  • महापालिकेकडून कारवाईचा फार्स

सेंट जोसेफ हायस्कूल ते सुधागड हायस्कूल च्या मुख्य रस्त्यावरील फेरीवाल्यावर कठोर कारवाई केली जात नाही. महापालिकेचे पथक कारवाई करण्यासाठी आले तर फेरीवाल्यांना आधीच त्याची कुणकुण लागलेली असते, त्यामुळे पथक येण्याचा सुगावा लागताच हे फेरीवाले नजीकच्या सोसायट्या मधून माल गुंडाळून पळ काढतात. व अतिक्रमण पथक गेले कि पुन्हा जागा काबीज करतात.

कळंबोली वसाहती मध्ये मुख्य रस्त्यावर अवैद्य पार्किंग केलेल्या वाहनांवर वारंवार कारवाई केली जात आहे. कोरोना काळामध्ये वाहतूक विभागाकडून होणाऱ्या कारवाया कमी करण्यात आल्या होत्या. परंतु निर्बंधांमध्ये शितिलता आल्यामुळे रहदारी वाढत आहे. अवैद्य पार्क करणाऱ्या वाहनांवर टोईंग क्रेन द्वारे कारवाई करण्याचे काम सुरू आहे.

निशिकांत विश्वकर (पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा कळंबोली)

कळंबोली येथील पदपथावर दुकाने लागणार्या फेरीवाल्यांवर वारंवार कारवाई केली जात आहे. फेरीवाल्यांचे माल सामान जप्त करून दंडात्मक कारवाई ही केली जात आहे.

सदाशिव कवटे

(प्रभाग अधिकारी कळंबोली)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com