पोलिसांना पाहून 'ते' आधी घाबरलेत, मग चेहऱ्यावर उमटलं स्मितहास्य !

पोलिसांना पाहून 'ते' आधी घाबरलेत, मग चेहऱ्यावर उमटलं स्मितहास्य !

उल्हासनगर : पोलिस आणि त्यातही गुन्हे अन्वेषण शाखेचा पोलिस म्हटला की की तो कठोर रागीट अशी प्रतिमा आहे. मात्र याच उल्हासनगर गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिस दादाने लॉक डाऊनमध्ये रोजीरोटीचे साधन नसल्याने उपासमार होत असलेल्या कातकरी आदिवासींच्या मदतीला धावून जाण्याचे आणि त्यांना जीवनावश्यक वस्तू देण्याचे काम केले आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश तरडे असे या पोलीस दादाचे नाव आहे. कातकरी आदिवासी हा विशेषतः वीटभट्टीवर काम करून उदरनिर्वाह करणारा समाज आहे. पण लॉक डाऊनमध्ये विटभट्या बंद असल्याने त्यांच्यावर उपासमारीचे संकट ओढावले आहे.

अशा प्रसंगी त्यांना मदतीचा हात देण्यासाठी वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश तरडे यांनी त्यांच्या टीम सोबत कातकरी आदिवासी पाडे गाठून त्यांना तांदूळ, चण्याचे पीठ, गूळ, तेल, साखर, चहा पावडर आदी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.

पोलिसांची जीप बघून प्रथम घाबरलेले हे कातकरी आदिवासी नागरिक त्यातून उतरलेल्या पोलिस दादाने दिलेल्या मदतीच्या हाताने भारावून गेले.

महत्वाच्या बातम्या :  

police brothers helped katkari aadivasi people in ulhasnagar area

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com