Coronavirus : मृत पोलिसांच्या कुटूंबियांना मिळणार इतक्या लाखांची मदत

police
police

मुंबई : कोरोनाविरुध्दच्या लढ्यात पोलिस दल मोठी भूमिका निभावत आहेत. कोरोनाविरुध्दच्या लढ्यात शहिद झालेल्या पोलिसांना 50 लाखाची आर्थिक मदत आणि कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी मिळते. सरकारी मदतीशिवाय या पोलिसांना मुंबई पोलिस फाऊंडेशनच्यावतीने दहा लाख रुपयाची जादाची मदत मिळणार आहे. पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांनी हा निर्णय घेतला असून त्याचे सर्वस्तरातून स्वागत होत आहे.

मुंबईत कोरोनाविरुध्दच्या लढ्यात डॉक्टर, नर्स, सफाई कामगारासह, पोलिस जवानही 24 तास कर्तव्य बजावत आहे. त्यातून अनेक पोलिसांना कोरोनाची लागण झाली. आतापर्यंत कोरोनामुळे आठ पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. या पोलिसांना शासनाच्या घोषित मदतीशिवाय मुंबई पोलिस फाऊंडेशनच्यावतीने दहा लाखाच्या आर्थिक मदत मिळणार आहे. प्रादेशिक विभाग आणि विविध घटक (झोन) मध्ये मृत पावलेल्या पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची यादी तयार करण्याचे आदेश पोलिस आयुक्त परमवीर सिंह यांनी दिले आहे. संकलित केलेली माहिती मुंबई पोलिस फाउंडेशनच्या संकेतस्थळावर पाठविण्याचेही आदेश आयुक्तांनी दिलेले आहेत. 

मुंबई पोलिस फाऊंडेशन काय आहे? 
मुंबई पोलिस फाऊंडेशनची स्थापना 2018 मध्ये करण्यात आली. धर्मादाय आयुक्तांकडे मुंबई त्याची रितसर नोंदणी करण्यात आली आहे. या फाऊंडेशनला व्यापारी, व्यावसायिक, सिने कलाकार, सामाजिक संस्थानी सढळ हाताने आर्थिक मदत केली आहे. या पैशातून मुंबई पोलिसांना वेगवेगळ्या स्वरुपात आर्थिक मदत केली जाते. या मदतीचा लेखाजोखा धर्मादाय आयुक्तांकडे सादर करण्यात येतो.

कोरोना विरुद्धच्या लढ्यात शहीद झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना एकूण  65 लाख रुपयाचे आर्थिक मदत देण्यात येत आहे. एक्सिस बँकेकडून मिळणाऱ्या 5 लाख रुपयाच्या विम्याची रक्कम दोन मृत पोलिसांच्या खात्यात जमा झाली आहे. तर उर्वरीत मृत पोलिसांच्या खात्यात एक-दोन दिवसात ती रक्कम जमा होईल. शासनामार्फत मिळणारी प्रत्येकी 50 लाख रुपयांची मदत आतापर्यत तीन मृत पोलिसांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. इतरांच्या खात्यात लवकरच जमा होईल. मुंबई पोलिस फाऊंडेशनचे 10 लाखाची रक्कम जवळपास सर्वच मृत पोलिस जवानांच्या खात्यात जमा झालेली आहे, अशी माहिती पोलिस प्रशासनाचे अतिरिक्त आयुक्त बजाज यांनी दिली आहे. 

कोरोनामुळे मृत्यु झालेल्या पोलिसांना मिळणार 65 लाखाची मदत

  • राज्य सरकारकडून- 50 लाख रुपये 
  • मुंबई पोलीस फाऊंडेशन- 10 लाख 
  • एक्सिस बँकेचा विमा- 5 लाख 

कोरोना युद्धात शहीद पोलिस जवान-अधिकारी
- अमोल हनुमंत कुलकर्णी, सहाय्यक पोलिस निरीक्षक, शाहू नगर पोलिस ठाणे
- मधुकर माने, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक, नागपाडा परिवहन विभाग
- मुरलीधर वाघमारे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक, शिवडी पोलिस ठाणे
- सुनील दत्तात्रय करगुटकर, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक, विनोबा भावे पोलिस ठाणे 
- चंद्रकांत गणपत पैदूरकर, पो. हवालदार, वाकोला पोलिस ठाणे
- संदीप महादेव सुर्वे, पो. हवालदार, संरक्षण व सुरक्षा विभाग
- शिवाजी नारायण सोनवणे,  पोय हवालदार, कुर्ला वाहतूक विभाग
- नाईक भगवान सुरेश, पो. हवालदार,  शिवाजीनगर पोलिस ठाणे

from the Police Foundation the dead policemen will get a total of Rs 65 lakh

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com