
मुंबई : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असून मुंबईत सार्वजनिक गणपतींचे आगमन सुरु झाले आहे. रविवार, १० ऑगस्ट रोजी पारंपारिक ढोल-ताशांच्या आवाजात लालबाग, परळ आणि दादरसारख्या प्रमुख मंडळांमधून गणपतींचे आगमन मोठ्या प्रमाणात झाले. मात्र या उत्सवादरम्यान, मुंबई पोलिसांनी कडक सूचना जारी केल्या आहेत. पोलिसांनी गणेशोत्सवात डीजेवर बंदी घातली असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे सांगितले आहे.