esakal | काँग्रेसचे मंत्री नितीन राऊत शरद पवारांना म्हणतात, 1971 चे युद्ध आठवलं तर बरं होईल...
sakal

बोलून बातमी शोधा

काँग्रेसचे मंत्री नितीन राऊत शरद पवारांना म्हणतात, 1971 चे युद्ध आठवलं तर बरं होईल...

शरद पवार आमचे नेते आहेत, परंतु त्यांनी 1971 साली झालेले युद्ध आठवलं असते तर बरं झाले असते, अशी प्रतिक्रिया ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी दिली

काँग्रेसचे मंत्री नितीन राऊत शरद पवारांना म्हणतात, 1971 चे युद्ध आठवलं तर बरं होईल...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : शरद पवार आमचे नेते आहेत, परंतु त्यांनी 1971 साली झालेले युद्ध आठवलं असते तर बरं झाले असते, अशी प्रतिक्रिया ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी दिली. नितीन राऊत म्हणाले की, शरद पवार आमचे नेते आहेत. महाविकास आघाडीचे नेते आहेत, यूपीएचे प्रमुख घटकपक्ष आहेत. राहुल गांधी यांनी चीनबाबत व्यक्त केलेली चिंता मूलभूत प्रश्नांबाबत आहे. पवार साहेबांनी विसरायला नको की 1962 च्या युद्धावेळी असलेली परिस्थिती वेगळी होती, देश शस्रसज्ज होत होता. यशवंतराव चव्हाण हे संरक्षण मंत्री होते, इंदिराजींनी 1971 चं युद्ध जिंकले होते, हे पण पवारांना आठवले असते तर बरे झाले असते.

मोठी बातमी - आता वीजबिल भरा एकरकमी आणि मिळवा 'इतकी' सवलत; वाचा तुमच्या फायद्याची बातमी..

शरद पवार काँग्रेसच्या काळात संरक्षण मंत्री असताना त्यांनी काही चुका दुरुस्त केल्या असत्या तर बरे झाले असते. पवार काँग्रेसमध्येच तयार झालेले नेतृत्व आहे. त्यांच्या मनात काँग्रेसबद्दल आपुलकी आहे. पवारांनी राहुल गांधी आणि सोनिया गांधींशी चर्चा केली असती तर त्यांच्या वक्तव्याचा अर्थ लक्षात आला असता. पवार यांनी मोदींना प्रसार माध्यमांना सामोरे जाऊन वस्तुस्थिती देशासमोर मांडण्याचा सल्ला दिला पाहिजे.'
राऊत म्हणाले की, संवादात कुठेतरी चूक झाली आहे. राहुल गांधी हे देशाला एकसंघ ठेवण्यासाठी बोलले आहेत. सीमेवर काय घडले हे जाणून घेण्याचा अधिकार प्रत्येक भारतीयाला आहे. शरद पवारांनी पंतप्रधानांना सांगायला हवे  की, प्रेस समोर येऊन मन की बात सांगण्याऐवजी याबाबत जन की बात सांगायला हवी.

मोठी बातमी - वीजबिल जास्त येण्यामागची 'ही' आहेत कारणं, 'म्हणून' बसलाय तुम्हाला वीजबिलाचा शॉक...

राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणाले होते की, लडाखमध्ये झालेल्या संघर्षात चीनने किती भाग बळकावला आहे याबाबत माहिती नाही. मात्र 1962 च्या युद्धात चीनने लडाखमधील बळकावेला 45 हजार चौरस किलोमीटरचा भाग चीनच्या ताब्यात आहे. तो भाग अद्याप आपल्याला मुक्त करता आलेला नाही, ही बाब विसरता येणार नाही. त्यामुळे आरोप करताना आपण भूतकाळात काय केले आहे, याचा विचार केला पाहिजे. राष्ट्रीय सुरक्षेसारख्या प्रश्नावर राजकारण करणे योग्य नाही.

politics congress leader nitin raut on sharad pawar about 1971 war