esakal | नवी मुंबई, ठाण्यात वीजचोर शिरजोर
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai

नवी मुंबई, ठाण्यात वीजचोर शिरजोर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : महावितरणच्या (MSEB) भांडुप (Bhandup) परिमंडळात वीजचोरांविरुद्ध जोरदार मोहीम सुरू असून, महावितरणच्या भरारी पथकाने मागील आठवड्यात घणसोली भागात केलेल्या तपासणीत तब्बल ४४ लाखांची ४८८ वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आणली आहेत.

महावितरणने केलेल्या या घडक कारवाईमुळे घणसोली भागातील वीजचोरांचे धाबे दणाणले आहेत. भांडुप परिमंडळचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी गत ३० सप्टेंबरला ऐरोली उपविभाग कार्यालयांतर्गत असलेल्या घणसोली शाखा येथे आढावा बैठक घेऊन त्या भागात वीजचोरी शोधमोहीम राबविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार १ ते ७ ऑक्टोबरला घणसोलीत वीजचोरीबाबत विशेष तपासणी मोहीम हाती घेतली होती.

हेही वाचा: शेतकऱ्यांना आता 8 तासच वीजपुरवठा! वीजनिर्मितीवर परिणाम झाल्याचे कारण

या मोहिमेसाठी आठ पथके स्थापन केली होती. या मोहिमेत वीजबिलाची थकबाकी असलेल्या तसेच यापूर्वी वीजपुरवठा खंडित केलेल्या वीज ग्राहकांच्या वीजजोडणीची तपासणी केली. या कारवाईमध्ये वीजजोडणीतून ४१६ ग्राहकांनी ३० लाख १२ हजार २३३ युनिट्सची ४१.१२ लाखांची वीजचोरी केल्याचे आढळून आले. ७२ ठिकाणी वीजग्राहक दुसरीकडून वीज घेत असल्याचे आढळून आले.

loading image
go to top