"खुन्यांना पाठीशी घालणारं सरकार"; प्रवीण दरेकरांनी सरकारला धरलं धारेवर

"खुन्यांना पाठीशी घालणारं सरकार"; प्रवीण दरेकरांनी सरकारला धरलं धारेवर

मुंबई : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणानंतर राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी सरकारला चांगलंच घेरलं आहे. याप्रकरणी विरोधकांकडून सचिन वाझे यांच्यावर कारवाईची सातत्याने मागणी केली जात होती. दरम्यान आज महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांची सध्याच्या पदावरून बदली केली जाणार असल्याचं सभागृहात सांगितलं. मात्र सचिन वाझे यांना तात्काळ निलंबित करा आणि सचिन वाझे यांची अटक करा अशी मागणी विरोधकांकडून केली जातेय. 

ठाकरे सरकार खुन्यांना पाठीशी घालत आहे

"सचिन वाझेंनीच माझ्या पतीचा खून केल्याचा थेट आरोप मनसूख हिरेन यांच्या पत्नी विमला मनसुख यांनी पत्राव्दारे केला असून वाझेंविरोधात सकृतदर्शनी भक्कम पुरावे असतानाही ठाकरे सरकार खुन्यांना पाठीशी घालत आहे", असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता प्रविण दरेकर यांनी केला.

सचिन वाझेंच्या अटकेची मागणी

विरोधी पक्षाने कायदा व सुवयवसा या विषयावर नियम 260 अन्वये दिलेल्या प्रस्तावावर गृह मंत्री अनिल देशमुख विधान परिषदेत उत्तर देत असताना हरकतीचा मुद्दा उपस्थित करुन दरेकर यांनी सचिन वाझेंच्या अटकेची मागणी केली.  दरेकरांनी असेही सांगितले की, ठाकरे सरकारच्या कार्यपद्धतीविषयी संशय व्यक्त केला जातोय, पूजा चव्हाण प्रकरणातही ठाकरे सरकारने 20 दिवस एफआयआर दाखल करून घेतला नाही, त्यातही असाच वेळकाढूपणा केला, अरुण राठोड आजही गायब आहे, हॉस्पिटलमध्ये भरती झालेली पूजा अरुण राठोड कोण आहे, याचाही अजून पत्ता लागलेला नाही, लॅपटॉपमधील पुरावेही गायब करण्यात आलेले आहेत, पुरावे नष्ट झाल्यानंतर संजय राठोडांचा राजीनामा घेतला गेला.

ठाकरे सरकार असाच वेळकाढूपणा

मनसुख हिरेन प्रकरणातही ठाकरे सरकार असाच वेळकाढूपणा करुन पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहे का, असा संशय प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेलाही हा प्रश्न पडला आहे असंही प्रवीण दरेकर म्हणालेत.

जनतेचा सरकारवर विश्वास राहिलेला नाही

पुढे बोलताना प्रवीण दरेकर म्हणालेत की, "महाराष्ट्रात खुलेआम हत्या होत असून राज्यातील जनतेचा या महाविकास आघाडी सरकारवर विश्वास राहिलेला नाही, त्यामुळे सकृतदर्शनी पुरावे असलेल्या सचिन वाझेंना तत्काळ अटक करा, अशी मागणी दरेकरांनी केली.  

pravin darekar slams mahavikas aagahdi over mansukh hiren case and demand arrest of sachin vaze

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com