

Private Bus Fare Hike
Esakal
मुंबई : उन्हाळी सुट्टीच्या निमित्ताने गावी गेलेले मुंबईतील नोकरदार, विद्यार्थी आता परतीच्या प्रवासाची तयारी करीत आहेत; मात्र मुंबईला परतण्यासाठी त्यांना अव्वाच्या सव्वा पैसे मोजावे लागत आहेत. इंधन दरवाढीचे निमित्त करीत खासगी बसचालकांनी बसभाड्यात तब्बल अडीच पट वाढ केली आहे.