कोरोना लसीकरणासाठी खासगी डॉक्टरांचाही समावेश, 45 हजार डॉक्टरांनाही लसीचा डोस

कोरोना लसीकरणासाठी खासगी डॉक्टरांचाही समावेश, 45 हजार डॉक्टरांनाही लसीचा डोस

मुंबई: महाराष्ट्र सरकारने अखेर महाराष्ट्रातील सर्व खासगी डॉक्टरांना कोरोना लसीकरणाच्या डेटाबेसमध्ये समाविष्ट करण्याचे मान्य केले आहे. त्यानुसार, महाराष्ट्रातील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) जवळपास 45000 डॉक्टरांनाही कोरोना लसीचा डोस दिला जाणार आहे. 

कोरोनाला हरवण्यासाठी सर्वांचे लक्ष लसीकडे लागले आहे. दुसर्‍या आणि तिसर्‍या टप्प्यातील चाचण्या मुंबईसह देशभरात सुरू आहेत. जर सर्व काही व्यवस्थित झाले तर पुढील तीन ते 4 महिन्यांत ही लस उपलब्ध होईल. अशा परिस्थितीत कोरोना विरोधात लढा देणाऱ्या देशातील सर्व डॉक्टर आणि इतर आरोग्यसेवा कामगारांना लसीचा डोस देण्याची केंद्र सरकारने योजना आखली आहे. सर्व राज्यांना डॉक्टर आणि आरोग्य सेवा देणाऱ्या कामगारांची यादी तयार करण्यास सांगण्यात आले आहे. मात्र या यादीमध्ये खासगी क्लिनिकमधील डॉक्टर आणि कर्मचार्‍यांकडे दुर्लक्ष केले गेले. 

महाराष्ट्र आयएमएचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितले की, " आमचा विरोध आणि माध्यमांच्या दबावामुळे सरकारनेही आम्हाला या यादीमध्ये समाविष्ट केले आहे. बुधवारी झालेल्या बैठकीत आमच्याकडून सर्व डॉक्टरांचा तपशील विचारला गेला. आमच्या संस्थेत एकूण 45000 डॉक्टर आहेत. आम्ही आता त्यांचा तपशील सरकारला पाठवू. 

यापूर्वी अधिसूचित केल्याप्रमाणे, महाराष्ट्र शासनाने 1 ऑक्टोबर 2020 रोजी महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त आणि विभागीय आयुक्तांना उद्देशून जरी केलेल्या परिपत्रकाद्वारे महाराष्ट्राच्या सर्व खासगी डॉक्टरांना प्रस्तावित कोरोना लसीकरणातून वगळण्यात आले होते. हे परिपत्रक भारत सरकारच्या प्रस्तावित मार्गदर्शक तत्त्वाविरूद्ध होते, भारत सरकारच्या परिपत्रकात सरकारी आणि सर्व प्रकारच्या खाजगी डॉक्टरांचा यात समावेश असावा असे नमूद केले होते.

महाराष्ट्रातील 2,50,000 डॉक्टरांना वगळण्याच्या निर्णयाबाबत सर्व डॉक्टरांमध्ये कमालीचा असंतोष पसरला होता. मात्र, अखेर महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने महाराष्ट्र राज्यातील सर्व डॉक्टरांना प्रस्तावित कोरोना लसीकरण डेटाबेसमध्ये समाविष्ट केले जाईल असे आयएमएला कळवले.

----------------------------

(संपादनः पूजा विचारे)

Private doctors including 45 thousand doctors were vaccinated for corona vaccination

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com