
कोरोना चाचणीत खासगी प्रयोगशाळांनी शासकीय प्रयोगशाळांना मागे टाकले आहे.
मुंबई - कोरोना चाचणीत खासगी प्रयोगशाळांनी शासकीय प्रयोगशाळांना मागे टाकले आहे. खासगी प्रयोगशाळा या सरकारी प्रयोगशाळापेक्षा पुढे गेल्या आहेत. शुक्रवारी खासगी प्रयोगशाळेत सर्वाधिक चाचण्या झाल्या असुन 3 हजार 044 करण्यात आल्या. तर, सरकारी प्रयोगशाळेत 2 हजार 776 कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. या आठवड्याच्या बुधवारपासून खासगी प्रयोगशाळेतल्या चाचण्यांची संख्या वाढली आहे. दरम्यान, 24 एप्रिलपर्यंत शासकीय प्रयोगशाळेत एकूण 50 हजार 016 एवढ्या चाचण्या करण्यात आल्या.
आता विनाकारण घराबाहेर फिराल तर हवेत उडणारे पोलिस लागतील मागे...
कोरोनाच्या उपचारांसाठी मोठ्या प्रमाणात चाचण्या होणं गरजेचं असल्याचं वारंवार समोर आले आहे. कारण, कोरोना या विषाणूवर कोणत्याही प्रकारची लस अद्याप उपलब्ध नाही. त्यासाठी सरकारी रुग्णालयात चाचण्यांची परवानगी दिल्यानंतर खासगी रुग्णालयातही आता कोरोनाची चाचण्या केल्या जातात. त्यामूळे, एकूणच चाचण्या होण्याच्या संख्येत ही वाढ होत आहे. दरम्यान, खासगी लॅबमध्ये बुधवारपासून चाचण्यांचे प्रमाण वाढले असुन 24 एप्रिलपर्यंत एकूण 52 हजार 173 चाचण्यांची नोंद करण्यात आली आहे.
शुक्रवार (24 एप्रिल ) रोजी झालेल्या चाचण्या -
शुक्रवारी संध्याकाळी 8 वाजेपर्यंत सरकारी आणि खासगी प्रयोगशाळेत एकूण 5 हजार 820 चाचण्या केल्या गेल्या. सरकारी प्रयोगशाळेत 2 हजार 776 आणि खाजगी प्रयोगशाळेत 3 हजार 044 चाचण्या केल्या गेल्या.
पाकिस्तानी अधिकाऱ्यालाही 'या' भारतीय वैमानिकाचं कौतुक करण्यावाचून राहवलं नाही, वाचा असं काय घडलं...
'या' कारणांमुळे वाढली खासगी प्रयोगशाळेतील चाचण्यांची संख्या -
मुंबईत वेगवेगळ्या आर्थिक क्षमतेचे नागरिक राहतात. यामध्ये बऱ्यापैकी उत्पन्न असणारे नागरिक हे सरकारी टेस्टिंग सेंटर्सपेक्षा खासगी टेस्टिंग सेंटर्स किंवा रुग्णालयात जाणं पसंत करतायत.
स्वच्छतेची काळजी चांगली घेतली जाते.
मुंबई पालिका क्षेत्रात सर्वात जास्त खासगी प्रयोगशाळा आहेत. खासगी प्रयोगशाळा त्यांच्या ठराविक काळात सुरु असतात. शिवाय तिथे काम करणारे कर्मचारी सर्व प्रकारच्या स्वच्छतेचे नियम पाळतात असा अनेकांचा समाज आहे म्हणूनही खासगी रुग्णालय किंवा टेस्ट सेंटर्सला जास्त नागरिक जाण्याची शकता आहे.
आता तिसरा लॉक डाऊन, कारण लॉक डाऊन आता जून पर्यंत वाढणार?
महाराष्ट्रात सर्वाधिक प्रयोगशाळा चाचण्या -
देशात कोरोना निदानाच्या सर्वाधिक प्रयोगशाळा चाचण्या महाराष्ट्रात आहेत. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात प्रयोगशाळा उभारण्यावर भर दिला असून, कोरोनाचा उद्रेक झालेल्या भागात चाचण्यांचे प्रमाण वाढण्याच्या दृष्टीने खासगी प्रयोगाशाळांचीही मदत घेण्यात आली आहे.
राज्यात 9 मार्चला कोरोनाचे पहिले दोन रुग्ण पुण्यात आढळले. त्या वेळी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्ही) ही एकमेव प्रयोगशाळा होती. त्यानंतर, 43 दिवसांमध्ये 43 कोविड चाचणी प्रयोगाशाळा उभारण्यात आल्या. त्यापैकी 23 सरकारी असून, 20 खासगी आहेत. दरम्यान येत्या काही दिवसांत आणखी प्रयोगशाळा वाढवण्यात येणार आहेत. चाचण्या वाढल्या की रोग निदान होऊन रुग्णांवर तात्काळ उपचार होण्यास मदत होईल.
private testing labs tested greter number of covid samples than government labs