प्रसिद्ध कवी दिलीप वि. चित्रे यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 जुलै 2017

'हिमगंध' हा त्यांचा एका अमेरिकावासी कवीचा पहिला काव्यसंग्रह  तर 'अलीबाबाची हीच गुहा'  या नाटकात अमेरिकेतील भारतीय पहिल्या पिढीचे  वेगवेगळे अनुभव संगीत नाटकाच्या माध्यमातून प्रकटलेले होते.

पुणे - अमेरिकेतील प्रसिद्ध मराठी कवी दिलीप वि. चित्रे यांचे शुक्रवारी (30 जून) सन सिटी सेंटर फ्लॉरिडा येथे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी शोभा, मुले रोहित आणि अमित, सुना, नातवंडे असा परिवार आहे. 

'कुंपणापलिकडले शेत' हा दिलीप चित्रे आणि मुकुंद सोनपतकी या दोघांनी संपादित केलेला भारताबाहेर राहणार्‍या लेखकांनी लिहिलेल्या कथांचा संग्रह  खूप गाजला. विविध देशांतील जीवनाची झलक असलेल्या कथा त्या संग्रहात होत्या.

'हिमगंध' हा त्यांचा एका अमेरिकावासी कवीचा पहिला काव्यसंग्रह  तर 'अलीबाबाची हीच गुहा'  या नाटकात अमेरिकेतील भारतीय पहिल्या पिढीचे  वेगवेगळे अनुभव संगीत नाटकाच्या माध्यमातून प्रकटलेले होते.

हे नाटक पहिल्या 'जागतिक मराठी परिषदेत" अमेरिकेतल्या कलाकारांनी सादर केले होते.
पश्चिमा, महाराष्ट्र फाऊंडेशन अशा संस्थांतून त्यांनी भरीव सामाजिक कार्य केले. त्यांनी लिहिलेल्या गीतांना संगीतकार राम फाट्क यांनी चाली दिल्या होत्या आणि 'स्वर हे पश्चिमरंगी' या शीर्षकाखाली त्या प्रकाशित झाल्या होत्या.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
मुंबई: क्रिकेटच्या बॅटने केली भावाची हत्या
बलात्कार पीडित महिलेवर चौथ्यांदा ऍसिड हल्ला
गोमांसावरून हत्येप्रकरणी भाजप नेत्याला अटक​
चंद्रपूर: खासगी बसला अपघात, 20 जण जखमी​
दोनही हातांनी वाजलेली टाळी​
जमावाच्या हल्ल्यांनी राष्ट्रपती चिंतित​
महिला क्रिकेटमध्ये आज भारत-पाक लढत​
जोड नसलेला उदारमतवाद​
#स्पर्धापरीक्षा - गुरुत्वीय लहरीचा संशोधनात्मक प्रयोग​
मोदी-ट्रम्प भेटीचं फलित (श्रीराम पवार)​
शापित देवभूमीला शांततेची आस (किशोर जामकर)​

Web Title: Pune news Poet Dilip Chitre passes away