चेक फ्राॅम होम... एकाच क्लिकवर डाॅक्टरांकडून उपचार

चेक फ्राॅम होम... एकाच क्लिकवर डाॅक्टरांकडून उपचार

मुंबई : क्वारंटाईनमुळे सध्या घरातच अडकून पडलेल्या ठाण्यातील डॉक्टरने आता `वर्क फ्राॅम होम`च्या धर्तीवर `चेक फ्राॅम होम` म्हणत चक्क आॅनलाईन वैद्यकीय मार्गदर्शन देणारे संकेतस्थळ सुरू केले आहे. क्वारंटाईनच्या पाचव्या दिवशी डॉ. समीर देशपांडे आणि जय शहा यांनी इओन केअर (एईओएन) पोर्टल सुरू करून गरजूंना एका क्लिकवर वैद्यकीय सेवा उपलब्ध केली आहे.

हेही वाचा : आता डाॅक्टर पण करू शकतात `वर्क फ्राॅम होम`; मेडिकल असोसिएशनची भन्नाट शक्कल 

ठाण्यातील इन्फिनिटी मेडिसर्ज सेंटर स्पेशालिटी रुग्णालयाचे डॉ. समीर देशपांडे सध्या क्वारंटाईनमध्ये आहेत. रुग्णालयात आलेल्या एका रुग्णावर ते आणि त्यांची एक टीम उपचार करत होती. तो रुग्ण कोरोनाबाधित निघाला. त्यामुळे रुग्णालय सील केल्यावर
त्यांनीही सुरक्षेचा उपाय म्हणून स्वतः हून क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला. मात्र, जगाला संकटात टाकणाऱ्या कोरोना साथीच्या विरोधात डॉक्टर म्हणून कर्तव्यावर असणे अत्यावश्यक आहे, याची जाणीव त्यांना सतत होत होती. त्यातूनच क्वारंटाईनच्या तिसऱ्या दिवशी त्यांना व्हर्च्युअल वैद्यकीय सेवेची संकल्पना सुचली आणि वेबपोर्टलमध्ये तज्ज्ञ असलेल्या जय शहा यांच्या मदतीने ती पाचव्या दिवशी प्रत्यक्षातही आली. 

मोठी बातमी : झाला खुलासा, असा घुसला भारतीय नौदलात कोरोना व्हायरस...

https://aeon.care या वैद्यकीय संकेतस्थळावर केवळ कोरोनाच नाही, तर अन्य आजारांबाबतही माहिती मिळू शकते. वेगवेगळ्या डाॅक्टरांची यादीही येथे आहे जे नागरिकांना मोफत वैद्यकीय सल्ला देतात. लाॅकडाऊनच्या कालावधीमध्ये अनेकांना घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे, पण अनेक आजारांवरील माहिती, सल्ला मिळणे आवश्यक आहे, या हेतूने इओनची निर्मिती केली, असे डॉ. समीर देशपांडे यांनी सांगितले. 

व्हर्च्युअल वैद्यकीय सल्ला केंद्र आवश्यक
आजच्या काळात घराबाहेर न पडणे अत्यंत गरजेचे आहे. अशावेळी घरबसल्या वैद्यकीय सेवा ना नफा तत्त्वावर उपलब्ध करायला हवी आणि ती लोकांपर्यंत पोहचायला देखील हवी. त्यातूनच हे क्लिक झाले. वैद्यकीय पार्श्वभूमी असल्याने माहिती, संशोधन करायला सुरुवात केली आणि माझा सहकारी जय यांच्याबरोबर आॅनलाईन काम सुरू केले. आता पोर्टल सुरू झाल्यापासून त्याला नागरिकांचा प्रतिसादही मिळत आहे यावरून व्हर्च्युअल वैद्यकीय सल्ला केंद्र आवश्यक आहे हेही जाणवले, असे डॉ. समीर देशपांडे म्हणाले. क्वारंटाईन सुरू झाल्यावर त्यांना प्रारंभी त्यांच्या सोसायटीतही थोडी अडचण आली होती, मात्र आता सर्व सुरळीत असून क्वारंटाईन संपल्यावर पुन्हा प्रत्यक्ष वैद्यकीय सेवा सुरू करणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

घरीच राहा.... सुरक्षित राहा
डॉक्टर असल्यामुळे आणि क्वारंटाईन कालावधीचाही अनुभव घेतल्यानंतर डॉ. समीर देशपांडे यांनी सर्व नागरिकांना सल्ला दिला आहे. कोरोनाचा लढा जिंकण्यासाठी सर्वानी घरात राहूनच यंत्रणेला सहकार्य करायला हवे. त्याशिवाय अन्य सुरक्षा नाही. त्यामुळे घरीच राहा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com