शुभमंगल सावधान ! रायगड जिल्ह्यात लग्नसोहळ्यासाठी पूर्वपरवानगी आवश्यक, फक्त 'इतके' जण राहू शकतात उपस्थित

marriage
marriage

महाड : रायगड जिल्ह्यामध्ये विविध तालुक्यांत लग्न सोहळा साजरा करण्यासाठी आता तहसीलदारांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. केवळ पन्नास लोकांच्या उपस्थितीतच सोशल डिस्टन्सिंग पाळत लग्न सोहळा साजरा करावा लागणार आहे. कोरोनाचा राज्यातील वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महसूल व वन आपत्ती व्यवस्थापन विभागाने हे आदेश पारित केले आहेत.

50 लोकांच्या मर्यादेतच सोशल डिस्टन्सिंग पाळून खुले, लॉन, विनावातानुकूलित मंगल कार्यालय, सभागृह येथे लग्न समारंभ पार पडण्यास परवानगी देण्याबाबत प्रशासनाकडे प्राप्त झालेल्या विविध मागण्या तसेच आता पावसाळा सुरू झाल्यामुळे खुले, लॉन, विनावातानुकूलित मंगल कार्यालय, सभागृह, घर व घराच्या परिसरात पन्नास लोकांच्या मर्यादेत सोशल डिस्टन्सिंग तसेच कोव्हिड-19 संदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांचे पालन करण्याच्या अटीवर लग्न समारंभ पार पाडण्यास परवानगी दिली जाणार आहे. यासाठी संबंधित तालुक्यातील तहसीलदारांकडे विवाह सोहळा आयोजित करण्याबाबत परवानगी घ्यावी लागणार आहे. याकरता विनंती अर्ज करावा लागणार आहे.

लग्न समारंभासाठी विनंती अर्ज प्राप्त झाल्यास या अर्जाच्या अनुषंगाने कोव्हिड-19 चा प्रादुर्भाव रोखण्याच्या संदर्भात शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचना विचारात घेऊन पनवेल महानगरपालिका क्षेत्र वगळून लग्न समारंभात परवानगी देण्याची कार्यवाही करण्याबाबत जिल्ह्यातील सर्व तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांना जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी निर्देश दिले आहेत.

कोरोनाचा राज्यातील वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाकडे निर्देश विचारात घेऊन पनवेल महानगरपालिका हद्दीतील नागरिकांनी पनवेल महानगरपालिका आयुक्त तसेच जिल्ह्यातील उर्वरित क्षेत्रातील नागरिकांनी संबंधित तहसीलदारांच्या पूर्वपरवानगीने लग्न समारंभ कार्यक्रम पार पाडले जातील, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नागरिकांना करण्यात आले आहे.

In Raigad district, prior permission of Tehsildar has to be taken for this important reason

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com