Railway Breaking: एलटीटी स्थानकात सात दिवसांचा मेगाब्लॉक; मेल- एक्सप्रेस गाड्यांचा वेळात बदल!

एलटीटीकडे येणार्‍या आणि जाणार्‍या गाड्यांच्या वेळापत्रकात मोठे बदल
Railway Breaking
Railway Breakingsakal

मध्य रेल्वेच्या लोकमान्य टिळक टर्मिनस येथील कोचिंग यार्डमध्ये पायभूत सुविधा उभारण्यासाठी आजपासून पुढील सात दिवस १८ फेबुवारी २०२४ पर्यत दररोज मध्यरात्रीपासून ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे एलटीटी स्थानक येणाऱ्या आणि सुटणाऱ्या अनेक मेल- एक्सप्रेस गाड्यांचा वेळात बदल करण्यात आलेला आहे.

Railway Breaking
Railway : जिल्ह्यातून रेल्वेला १०० कोटी महसूल; छत्रपती संभाजीनगर, चिकलठाणा, मुकुंदवाडीचे अधिक योगदान

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) येथे कोचिंग सुविधा वाढवण्यासाठी मध्य रेल्वे ११/१२ फेब्रुवारी २०२४ (रविवार/सोमवार) ते १८ फेब्रुवारी २०२४ (रविवार/सोमवार) रात्रीपर्यत ७ दिवस लोकमान्य टिळक टर्मिनस यार्डमध्ये "मध्यरात्री ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक" घेणार आहे. या ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक दररोज रात्री १०. ३० ते मध्य रात्री ३.३० वाजेपर्यत असणार आहे.

या ब्लॉकमुळे १२/१३ फेब्रुवारी २०२४ सोमवार/मंगळवारी ट्रेन क्रमांक 12141 लोकमान्य टिळक टर्मिनस- पाटलीपुत्र एक्स्प्रेस सोमवारी रात्री सुटणारी १३.०२.२०२४ (मंगळवार) रोजी ०४:३० वाजता पुन:निर्धारित करण्यात आली आहे.

Railway Breaking
Railway News: एक्सप्रेससमोर उडी मारून मोटरमॅननेच संपवले जिवन!

ट्रेन क्रमांक 22538 लोकमान्य टिळक टर्मिनस- गोरखपूर कुशीनगर एक्स्प्रेस ,ट्रेन क्रमांक 11061 लोकमान्य टिळक टर्मिनस- जयनगर एक्स्प्रेस या गाड्यांचा वेळ पुन:निर्धारित करण्यात आली आहे. ट्रेन क्रमांक 22847 विशाखापट्टणम- लोकमान्य टिळक टर्मिनसएक्स्प्रेस सोमवारी ठाणे येथे समाप्त करण्यात येणार आहे. तसेच १४/१५,१६, १७ फेब्रुवारी २०२४ एलटीटी स्थानकातून रात्री सुटणाऱ्या आणि एलटीटी स्थानकात येणाऱ्या अनेक मेल- एक्सप्रेस गाड्यांचा वेळात बदल करण्यात आलेला आहे.

Railway Breaking
Railway News:घोलवड की न्यू घोलवड? एक महाराष्ट्रात तर दुसरं गुजरातमध्ये, प्रवाशांमध्ये गोंधळ; काय आहे प्रकरण जाणून घ्या?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com