Railway News: मध्यरेल्वेवर १२ अनारक्षित उन्हाळी विशेष ट्रेन!

Railway News
Railway Newssakal

Mumbai News: उन्हाळी हंगामात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन दादर-गोरखपूर, एलटीटी-गोरखपूर आणि सीएसएमटी- दानापूर दरम्यान अतिरिक्त बारा अनारक्षित उन्हाळी विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

सर्व गाड्या अनारक्षित म्हणून चालवण्यात येणार असून अतिजलद मेल-एक्स्प्रेस गाड्यांसाठी लागू असलेल्या सामान्य शुल्कासह यूटीएस प्रणालीद्वारे बुक केल्या जातील, असे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे.

Railway News
Railway Ticket Cancellation Charge: वेटिंग-आरएसी तिकीट रद्द झाल्यास आता संपूर्ण तिकीटाचे पैसे कापले जाणार नाहीत

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार ट्रेन क्रमांक ०१०१५ अनारक्षित विशेष ट्रेन २७ एप्रिल, १ मे आणि ४ मे रोजी दादर येथून रात्री ११.३० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ९.३० वाजता गोरखपूर येथे पोहोचेल. ट्रेन क्रमांक ०१०१६ अनारक्षित विशेष गोरखपूर येथून २९ एप्रिल, ३ मे आणि ६ मे रोजी दुपारी ३.३० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी मध्यरात्री १२.२५ वाजता दादर येथे पोहोचेल.

यासोबत ट्रेन क्रमांक ०१४२७ अनारक्षित विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई २६ एप्रिल आणि १ मे रोजी रात्री ११.५० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ९.३० वाजता गोरखपूर येथे पोहोचेल. ट्रेन क्रमांक ०१४२८ अनारक्षित विशेष गोरखपूर २८ एप्रिल आणि ३ मे रोजी दुपारी ३.३० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे तिसऱ्या दिवशी मध्यरात्री १२.२५ वाजता पोहोचणार आहे.

Railway News
Jalgaon Central Railway News: मध्य रेल्वेकडून अवघ्या 20 रुपयांत भरपेट जेवण! अनारक्षित डब्यांमधील प्रवाशांसाठी सुविधा

ट्रेन क्रमांक ०१०५१ अनारक्षित विशेष २८ एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून रात्री ११.२० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता दानापूर येथे पोहोचेल. ट्रेन क्रमांक ०१०५२ अनारक्षित विशेष गाडी ३० एप्रिल रोजी दुपारी १.३० वाजता दानापूर येथून सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५ वाजता पोहोचणार आहे.

Railway News
Railway News: रेल्वेच्या महाव्यवस्थापकाकडून कर्जत-लोणावळा घाटातील मान्सूनपूर्व कामाची पाहणी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com