Railway News: मुंबई ते थिवि दरम्यान ३२ अतिरिक्त उन्हाळी विशेष ट्रेन; गाड्यांचे आरक्षण सुरु

लोकमान्य टिळक टर्मिनस ते थिवि दरम्यान ३२ अतिरिक्त उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या चालविण्याची घोषणा केली आहे.
Railway News
Railway Newssakal

Railway News: उन्हाळ्याच्या सुट्टया सुरू झाल्यामुळे कोकणात जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुविधेसाठी मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस ते थिवि दरम्यान ३२ अतिरिक्त उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या चालविण्याची घोषणा केली आहे.

यापूर्वी मध्य रेल्वेने २५८ उन्हाळी विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. त्यामुळे आता उन्हाळी विशेष गाड्यांची संख्या २९० गाड्यावर पोहचली आहे.(mumbai thivi summer special trains)

.

Railway News
Mumbai Metro Rail Corporation : नामकरणातून ४० कोटींचे उत्पन्न

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, एलटीटी -थिवि- एलटीटी वातानुकूलित साप्ताहिक विशेष १६ फेऱ्या असणार आहे. ट्रेन क्रमांक 01187 वातानुकूलित साप्ताहिक विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई येथून १८ एप्रिल २०२४ ते ०६ जून २०२४ पर्यंत दर गुरुवारी रात्री १०.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०९.५० वाजता थिवि येथे पोहोचेल. ट्रेन क्रमांक 01188 वातानुकूलित साप्ताहिक विशेष थिवि येथून १९ एप्रिल २०२४ ते ७ जून २०२४ पर्यंत दर शुक्रवारी संध्याकाळी ४.३५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी पहाटे ३.४५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.

सेकंड सीटिंग उन्हाळी विशेष १६ फेऱ्या

ट्रेन क्रमांक 01129 सेकंड सीटिंग विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई येथून २० एप्रिल २०२४ ते ८ जून २०२४ पर्यंत दर शनिवारी रात्री १०.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ९.५० वाजता थिवि येथे पोहोचेल. ट्रेन क्रमांक 01130 सेकंड सीटिंग विशेष थिवि येथून २१ एप्रिल २०२४ ते ९ जून २०२४ पर्यंत दर रविवारी संध्याकाळी ४.३५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ३.४५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.

Railway News
Railway Social Media: सोशल मीडियाच्या वापरात मध्य रेल्वे टॉप; मिळाले तब्बल इतके व्ह्यूज!

या उन्हाळी विशेष गाड्या ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड स्थानकांवर थांबणार आहे.(Thane, Panvel, Roha, Mangaon, Veer, Khed, Chiplun, Sawarda, Sangameshwar Road, Ratnagiri, Advali, Vilavede, Rajapur, Vaibhavwadi Road, Kankavali, Sindhudurg, Kudal and Sawantwadi)

आजपासून आरक्षण सुरु

लोकमान्य टिळक टर्मिनस ते थिवि दरम्यान ३२ अतिरिक्त उन्हाळी विशेष रेल्वे गाड्याचे आरक्षण १३ एप्रिल २०२४ पासून भारतीय रेल्वेच्या सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर उघडणारत आहे

Railway News
Railway News: उन्हाळी हंगामासाठी धावणार जादा रेल्वे; कोकणी माणसाला मिळणार दिलासा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com