येथे रेल्वे कर्मचारीच करतात दररोज कायद्याचे उल्लंघन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 मार्च 2020

बंद पुलाच्या बहाण्याने रूळ अोलांडून करताहेत सोईचा प्रवास; प्रवाशांचीही पायपीट

मुंबई : रेल्वे विभागाकडून कोणीही रूळ आेलांडू नये, यासाठी लाखो रुपयांच्या जाहिराती आणि जनजागृती केली जात असताना, परळ रेल्वेस्थानकांवर मात्र परळ वर्कशॉपमधील कर्मचारी, अधिकाऱ्यांचे मात्र सामूहिकरित्या दैनंदिन बेकायदेशीर रूळ अोलांडणे (ट्रेस पासिंग) सुरू असल्याचे दिसून आले आहे. परळ स्थानकावरील सीएसएमटी दिशेकडील पादचारी पूल दुरुस्तीसाठी बंद केल्याने रेल्वे कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी रूळ अोलांडणे सोयीचे असल्याचे परळ स्थानकावरील रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

आणखी एक गंभीर घटना, उल्हासनगरमधील 'ती' कोरोना पॉझिटिव्ह महिला गेली होती सत्संगला, तिथं होती १५०० लोकं

एल्फिन्स्टन रेल्वेस्थानकाच्या पुलावर चढताना चेंगराचेंगरीची घटना झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने मध्य रेल्वे पुलांची तपासणी केली होती. त्यानंतर परळ स्थानकावरील सीएसएमटी दिशेने जाणाऱ्या या पुलाला धोकादायक घोषित करण्यात आले होते. पुलाची दुरुस्ती वेळेत करण्याचे आदेश होते. त्यानंतर तब्बल दोन वर्षांनंतर या पुलाच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली आहे. त्यासाठी 16 मार्चपासून पुलाला बंद करण्यात आले आहे.

सावधान ! महाराष्ट्रात एका दिवसात वाढलेत ११ कोरोना रुग्ण; अजूनही बाहेर पडत असाल तर आत्ताच थांबा..

मात्र, या पुलावरूनच फलाट क्रमांक चार आणि पाच वर जाण्यासाठी एकमेव मार्ग असल्याने, या फलाटावर येणाऱ्या लोकल मध्ये बसण्यासाठी रेल्वे प्रवाशांना ट्रेस पासिंग करावी लागते आहे. परळ रेल्वे वर्कशॉप मधील कर्मचाऱ्यांसह सामान्य प्रवासीसुद्धा दैनंदिन ट्रेस पासिंग करताना दिसून येत असून, यादरम्यान दोन रेल्वे पोलिसांनासुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आले आहे. 

बाजारपेठांचे शटरडाउन....  

रेल्वे कर्मचारी, अधिकारी आणि त्यांच्यासह सामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात ट्रेस पासिंग करत असल्याने, ट्रेस पासिंग करताना प्रवाशांची गर्दी निर्माण होत आहे. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. 

#COVID19 : घाबरू नका! करोनाला निष्प्रभ करण्यासाठी प्रयत्न सुरू....

प्रवाशांची ट्रेस पासिंग होईपर्यंत या ठिकाणी ड्युटी लावण्यात आली आहे. या फलाटावर पोहचण्यासाठी प्रवाशांना दुसरा पर्याय नसल्याने, या मार्गाने त्यांना सोडावे लागते आहे. 
- रेल्वे पोलिस 

फलाटावर जाण्यासाठी दुसरा कोणताही पर्याय नाही. दुरुस्तीसाठी परळ स्थानकावरील सीएसएमटी दिशेने जाणाऱ्या पुलाची दुरुस्ती करण्यात येत असल्याने पुलाला बंद केल्याने ही परिस्थीती निर्माण झाली आहे. 
- नंदनवार,
स्टेशन मास्तर, परळ 

Railway workers here are violating the law daily


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Railway workers here are violating the law daily