सिडकोची 'स्वप्नपूर्ती' जलमय, खाजगी बिल्डरच्या बांधकामामुळे सोसायटीत घुसले पाणी

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 5 July 2020

सिडकोच्या ढिसाळ आणि बिल्डरधार्जिन नियोजनामुळे स्वप्नपूर्ती सोसायटीत गुडघाभर पाणी साठले आहे. विशेष म्हणजे पाणी साठल्याची तक्रार एक दिवस आधी करून सुद्धा सिडकोच्या अधिकाऱ्यांनी लक्ष न दिल्यामुळे गेले दोन रात्र स्वप्नपूर्ती सोसायटीतील रहिवाशी भीतीच्या सावटाखाली आहेत.

नवी मुंबई : सिडकोने खारघरमध्ये गरिबांसाठी उभारलेला आत्तापर्यंतचा सर्वात मोठा गृहप्रकल्प स्वप्नपूर्तीला पहिल्याच पावसाचा फटका बसला आहे. सिडकोच्या ढिसाळ आणि बिल्डरधार्जिन नियोजनामुळे स्वप्नपूर्ती सोसायटीत गुडघाभर पाणी साठले आहे. विशेष म्हणजे पाणी साठल्याची तक्रार एक दिवस आधी करून सुद्धा सिडकोच्या अधिकाऱ्यांनी लक्ष न दिल्यामुळे गेले दोन रात्र स्वप्नपूर्ती सोसायटीतील रहिवाशी भीतीच्या सावटाखाली आहेत.

महत्वाची बातमी : मुंबईतल्या 'या' भागात पाणी साचल्यास येथे तक्रार नोंदवा

खारघर सेक्टर 36 येथे सिडको निर्मित स्वप्नपूर्ती सोसायटीत मागील दोन वर्षांपासून पाणी साठण्याचा प्रकार घडत आहे.  सिडकोने स्वप्नपूर्ती सोसायटी तयार करताना आजूबाजूच्या बिल्डरांना पावसाच्या पाण्याचा निचरा करण्याबाबत नियोजन करण्याचे व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे या बांधकामांवर पडणारे पावसाचे पाणी सोसायटी पाठीमागील शेततातील खोलगट भागात गोळा होतो. या ठिकाणी स्वप्नपूर्ती सोसायटीची संरक्षण भिंत आहे. खोलगट भागात साठलेल्या पाण्याला बाहेर पडण्यास वाट नसल्यामुळे साठलेल्या पाण्यात प्रचंड दबाव निर्माण होऊन पाणी थेट संरक्षण भिंतीच्या निकृष्ट बांधकामाच्या खालून सोसायटीत घुसत आहे. रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे सोसायटीतील एल 30 क्रमाकांच्या इमारतीपासून अर्ध्या सोसायटीत गुडघाभर पाणी साठले आहे.

धक्कादायक! वांद्रे-वरळी सी लिंकवर 25 वर्षीय तरुणाची आत्महत्या 

अक्षरशः एखाद्या नदीतून वाहणाऱ्या पाण्याप्रमाणे इमारतींखाली साठलेले पाणी प्रवेशद्वाराच्या दिशेने वेगात वाहत आहे. पावसाच्या संतत धारेमुळे पाण्याची पातळी वाढतच चालली आहे. हळू-हळू साठलेल्या पाण्याचे सोसायटीच्या आतील इमारती वेढल्या गेल्या. तोपर्यंत इमारतींखाली उभी केलेल्या वाहनांची चाके पाण्यात बुडाली होती. इमारतींच्या वरच्या मजल्यांमध्ये राहणारे रहिवाशी पावसाचा हा खेळ खिडकीतून उघड्या डोळ्यांनी पाहत होते. रात्री 12 नंतर संपूर्ण सोसायटीला नदीचे रूप आले होते.सोसायटीतील काही सतर्क रहिवाशांनी एक दिवस आधीच सिडकोच्या अभियंत्यासोबत संपर्क करून परिस्थिती कानावर घातली. मात्र अभियंत्यांनी नेहमी प्रमाणे नागरिकांच्या तक्रारीकडे कानाडोळा केला. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे रात्री स्वप्नपूर्ती सोसायटीला तळ्याचे रूप प्राप्त झाले.

महत्वाची बातमी : मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग, आज असा असेल पावसाचा जोर 

सोसायटी आलेल्या पाण्यामुळे साप सुद्धा फिरताना काही नागरिकांनी पाहिले. त्यामुळे साठलेल्या पाण्यामुळे अधिकच धोका वाढला आहे. याबाबत सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांना सकाळच्या प्रतिनिधींनी छायाचित्रे दाखवून परिस्थितीबाबत अवगत केले. याबाबत  तात्काळ समस्या सोडवण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती चंद्र यांनी दिली.

मोठी बातमी : हवामान विभागाचा रेड अलर्ट! अऱबी समुंद्रात येणार एवढ्या उंचीच्या लाटा

सिडकोचे बिल्डरधार्जिन नियोजन 

स्वप्नपूर्ती सोसायटीच्या पाठीमागील शेत जमिनीत नामांकित बिल्डरांच्या टोलेजंग इमारतींचे बांधकाम सुरू आहे. बांधकाम करताना विकासकांनी पावसाच्या पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था न केल्यामुळे वाहत्या पाण्याला जाण्यासाठी वाट राहिली नाही. याठिकाणी नाला तयार करण्याचे शहाणपण अद्याप सिडकोला सुचलेले नाही. त्यामुळे दर पावसाळ्यात रहिवाशांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

rain water in navi mumbai CIDCO swapnapurti society read full story


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rain water in navi mumbai CIDCO swapnapurti society read full story