पोर्नोग्राफी प्रकरण : राज कुंद्राचा जामीनासाठी मुंबई हायकोर्टात अर्ज

High-Court-Mumbai
High-Court-Mumbaisakal media

मुंबई : पोर्नोग्राफी प्रकरणातील (pornography case) प्रमुख आरोपी उद्योगपती राज कुंद्राने (raj kundra) आता मुंबई उच्च न्यायालयात (bombay hc) जामीनासाठी अर्ज केला आहे. यापूर्वी महानगर दंडाधिकारी आणि सत्र न्यायालयाने त्याचा जामीन नामंजूर केला आहे.

मुंबई पोलिसांनी माझ्या विरोधात दाखल केलेल्या पुराव्यांमध्ये तथ्य नसून कनिष्ठ न्यायालयांंनी हा मुद्दा विचारात घेतला नाही, असा दावा कुंद्राने केला आहे. तसेच या प्रकरणातील अन्य आरोपींना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे, असेही अर्जात म्हटले आहे.

मुंबई पोलिसांनी कुंद्राविरोधात अश्लील साहित्य तयार करणे आणि प्रदर्शित करणे असे गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणात तपास सुरू असून कुंद्राच्या लैपटॉपमध्ये साठहून अधिक व्हिडीओ सापडले आहेत असे पोलिसांनी सांगितले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com