Raj Thackeray: मणिपूर हिंसाचारावर राज ठाकरेंनी व्यक्त केली काळजी; म्हणाले, भयंकर परिणाम...

परिस्थिती आटोक्यात आणण्यात केंद्र सरकारला अपयश का येतंय हे कळत नाही, असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
Raj Thackeray
Raj Thackeray
Updated on

Manipur Violence : ईशान्य भारतातील मणिपूर हे राज्य गेल्या दोन महिन्यांपासून धुमसतंय. या ठिकाणी जातीय हिंसाचार सुरु असून यामध्ये आजवर १३१ नागरिकांचा मृत्यू झाला असून हजारो लोक बेघर झाले आहेत. विस्थापित झालेले हे लोक सध्या शरणार्थी कॅम्पमध्ये राहत आहेत. यावर विरोधकांनी सुरुवातीपासून केंद्र सरकारला धारेवर धरलं आहे. पण आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील यावर आपली सविस्तर भूमिका मांडली आहे. या परिस्थितीची जाण व्हावी यासाठी त्यांनी एक भावनिक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. (Raj Thackeray expresses concern over Manipur violence)

राज ठाकरे यांनी या प्रश्नावर एक निवेदन प्रसिद्ध केलं असून यामध्ये केंद्र सरकारला इशारा दिला आहे. ठाकरे म्हणतात, "अशांत मणिपूरमधील हिंसाचारामुळं दुखावलेल्या लोकांच्या मनांवर फुंकर घातली नाही तर मणिपूरच नव्हे तर ईशान्य भारतात, देशापासून विभक्त होण्याचा विचार जोर पकडेल आणि त्याला मोदी सरकार जबाबदार असेल. म्हणून माझी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह विनंती आहे की त्यांनी ठोस पावलं उचलावीत त्यानंतर मणिपूर पूर्ववत होईल हे पाहावं" (Latest Marathi News)

Raj Thackeray
ShivSena Dhadak Morcha: "मुंबई महापालिकेचा सातबारा शिवसेनेच्या नावावर"; राऊतांचं भाजप-शिवसेनेला आव्हान

राज ठाकरेंची सविस्तर भूमिका काय?

मणिपूर हे राज्य सध्या शब्दशा धुमसतंय. केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या एका मंत्र्याच्या घरावरच लोकांनी संतापानं हल्ला चढवला इथपर्यंत परिस्थिती रसातळाला गेली आहे. हे सगळे गेले २ महिने सुरु आहे आणि तरीही परिस्थिती आटोक्यात आणण्यात केंद्र सरकारला अपयश का येतंय हे कळत नाही. (Marathi Tajya Batmya)

Raj Thackeray
Twitter rate limit: ट्विटर युजर्सना 'रेट लिमिट'चा फटका! पोस्ट करता येईना की फॉलो करता येईना

नरेंद्र मोदीजी ईशान्य भारताकडं काँग्रेसनं साफ दुर्लक्ष केलं म्हणून दूषण द्यायचं पण आज त्यांच्याच कार्यकाळात ईशान्य भारतातील एक राज्य धुमसत असताना पंतप्रधानांनी मौन का बाळगलं आहे? हे माझ्यासाठी अनाकलनीय आहे. मध्यंतरी देशाचे गृहमंत्री अमित शाह हे चार दिवस मणिपूरमध्ये जाऊन राहिले होते, तरीही परिस्थिती आटोक्यात का आली नाही? हा विषयावर काही दिवसापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं चिंता व्यक्त केली होती. त्यामुळं त्यांच्याकडून ठोस कृती होईल असं वाटलं होतं.

Raj Thackeray
Rahul Kanal: आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय राहुल कानाल यांचा CM शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

असो, मणिपूरच सध्याचं नेतृत्व जर परिस्थिती हाताळायला अपयशी ठरत असेल तर याबाबत योग्य निर्णय भारतीय जनता पक्षाच्या शीर्ष नेतृत्वानं करावा. ईशान्येकडील राज्यांना प्रवाहात आणण्यासाठी अटलजींनी खूप प्रयत्न केले होते. पण मणिपूरकडं ज्या पद्धतीनं दुर्लक्ष होत आहे ते पाहून हे सगळे प्रयत्न वाया जातील अशी भीती वाटते.

वेळीच मणिपूर शांत करून तिथल्या दुखावलेल्या लोकांच्या मनावर फुंकर नाही घातली तर मणिपूर नाही तर, ईशान्य भारतात देशापासून विभक्त होण्याचा विचार जोर पकडेल आणि त्याला सरकार जबाबदार असेल. म्हणून माझी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना आणि गृहमंत्री अमित शाहांना विनंती आहे की, ठोस पावले उचला मणिपूर पूर्ववत होईल हे पाहा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com