Raj Thackeray: राज ठाकरेंच्या स्वागतासाठी डोंबिवली सजली; भल्या मोठ्या कटाऊटनं वेधलं साऱ्यांचे लक्ष

कल्याण लोकसभेतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेत परिसराच्या आढावा घेणार आहेत | Kalyan will hold a meeting with the office bearers and workers of the Lok Sabha and review the area
Raj Thackeray
Raj Thackeraysakal

Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवस कल्याण लोकसभेच्या दौऱ्यावर आहेत. आज सायंकाळी यांचे कल्याण डोंबिवलीत आगमन होणार आहे. राज यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांची लगबग सुरू असून शहरात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात येत आहे.

त्यासोबतच मुख्य मार्गावरील चौकाचौकात राज यांचे 20 ते 25 फूट उंचीचे कटाऊट्स लावण्यात आले आहे. असे कटाऊट्स प्रथमच या मतदारसंघात लागले गेल्याने मनसेची ही निवडणूकीची पूर्वतयारी आहे का? राज आज नेमके पदाधिकारी, कार्यकर्ते यांना काय संबोधतात हे पहावे लागेल.

Raj Thackeray
Raj Thackeray On Maratha Reservation Bill: मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसण्यात आली; राज ठाकरेंनी साधला सरकारवर निशाणा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज पासून कल्याण व भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. आपल्या दोन दिवसांच्या दौऱ्यात ते पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत.

आज संध्याकाळी राज हे कल्याण पश्चिमेत स्प्रिंग टाईम हॉटेलमध्ये येणार असून भिवंडी लोकसभेतील कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची ते भेट घेणार आहेत. तर दुसऱ्या दिवशी 24 तारखेला कल्याण लोकभतील मधील डोंबिवली शहरातील मध्यवर्ती शाखेत पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन करत डोंबिवलीच्या जिमखाना हॉटेलमध्ये कल्याण लोकसभेतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेत परिसराच्या आढावा घेणार आहेत.

Raj Thackeray
Raj Thackeray and Ashish Shelar Meet: आशिष शेलारांसोबतच्या बैठकीत काय घडलं? राज ठाकरेंनी एका ओळीत संपवला विषय

यानिमित्ताने कल्याण डोंबिवली मध्ये मनसेकडून मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे. तसेच राज यांचे डोंबिवलीत राज ठाकरे यांचे 20 ते 25 फुटी कटआऊट लागेल आहेत. चौकाचौकात हे कटआऊट लावण्यात आल्याने जिथर तिथे जणू राज ठाकरेच दिसत आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा हा दौरा असून कल्याण लोकसभेत नेमकं राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तर गेले काही दिवसापूर्वी मनसे आमदार राजू पाटील यांचे भावी खासदार असे बॅनर व भाविक खासदाराचा केक स्वतः राजू पाटील यांनी कापल्याने कल्याण लोकसभेत मनसे उमेदवार देणार का असे प्रश्न उपस्थित होत होते. मात्र राज ठाकरे यांच्या या दौऱ्यामुळे नक्की मनसेची काय भूमिका असेल हे या दौऱ्यानंतर स्पष्ट होईल.

Raj Thackeray
Raj Thackeray : राज ठाकरे-आशिष शेलार भेट, तासभर चर्चा; केंद्रीय नेतृत्वाचा निरोप? पडद्याआड काय घडतंय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com