Raj Thackeray
esakal
मुंबई : पुढील चार ते पाच महिन्यांत मोठ्या राजकीय घडामोडी घडतील. विविध प्रश्नांवर जनतेमध्ये साचलेला असंतोष रस्त्यावर उतरू शकतो," असे भाकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी केले. त्याच वेळी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांऐवजी मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याच्या मागणीचा त्यांनी पुनरुच्चार केला. निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि जनतेचा विश्वास हा कोणत्याही पक्षाच्या विजय-पराभवापेक्षा महत्त्वाचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.