esakal | मुंबईत भगवं वादळ, राज ठाकरेंच्या 'चले जाओ' रॅलीची सुरवात...
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत भगवं वादळ, राज ठाकरेंच्या 'चले जाओ' रॅलीची सुरवात...

मुंबईत भगवं वादळ, राज ठाकरेंच्या 'चले जाओ' रॅलीची सुरवात...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज मुंबईमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येतंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अवैधरित्या महाराष्ट्रात राहणाऱ्या बांगलादेशी आणि पाकिस्तान्यांविरोधात एल्गार पुकारलाय. या मोर्चामध्ये राज ठाकरे यांचं संपूर्ण कुटुंब राज ठाकरे यांच्यासोबत  'चले जाओ' रॅलीमध्ये सहभागी झालंय. राज ठाकरे स्वतः या रॅलीचं नेतृत्व करतायत. यामध्ये राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे देखील राज ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावून सामील झाले आहेत. 

मोठी बातमी  VIDEO : 'चले जाओ' रॅलीआधी राज ठाकरे यांनी घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन..

राज ठाकरे यांनी नवा झेंडा आणि नवा अजेंडा घेऊन राजकारण करण्याचं ठरवलंय. अशात राज यांची हिंदुत्वाच्या मुद्यावर राजकारण करण्याची भूमिका अनेकांना भावलीये. अशात विविध संघटनांकडून राज ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेचं देशभरातील विविध संघटनांकडून स्वागत करण्यात आलं.  

राज्यभरातून  मनसैनिक मुंबईत : 

२३ जानेवारीला मनसेच्या महाअधिवेशनात राज ठाकरे यांनी अवैधरित्या बांगलादेशी आणि पाकिस्तान्यांविरोधात आवाज उठवला होता. अशात त्याचवेळी राज ठाकरे यांनी आजच्या मोर्चाची घोषणा केली होती. यालाच भरगोस प्रतिसाद देत लाखो मनसैनिक मुंबईत आलेत. पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिक , पालघर, ठाणे अशा विविध ठिकाणांहून मनसैनिक हातात मनसेचा नवा झेंडा घेत मुंबईत दाखल झालेत. हिंदू जिमखाना ते आझाद मैदान असा या मोर्चाचा  मार्ग असणार आहे.  

मोठी बातमी  'हिंदुहृदयसम्राट' नाही, राज ठाकरेंना मनसैनिकांनी दिली 'ही' उपाधी

महाराष्ट्रभरातून मनसैनिक मुंबई आल्याने या मोर्चाला उशीर झालाय. दुपारी १२ वाजता सुरु होणार मोर्चा दुपारी तीन वाजता सुरु झालाय. 

मोठी बातमी मनसेत इनकमिंग... 'या' नेत्यांनी केला 'मनसे'प्रवेश
 

raj thackerays chale jao rally starts from hindu gymkhana now heading towards aazad midan