Eknath Shinde: ठाणे जिल्ह्यात मनसे करणार ठाकरे गटाच्या उमेदवाराला मदत, शिंदेंच टेंशन वाढणार? sakal
मुंबई
Eknath Shinde: ठाणे जिल्ह्यात मनसे करणार ठाकरे गटाच्या उमेदवाराला मदत, शिंदेंच टेंशन वाढणार?
Raj Thackeray With Shivsena: शिंदे गटाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा विचार अंबरनाथ मनसैनिकांनी केला आहे.
Uddhav Thackeray: अंबरनाथ येथे मनसे शिवसेना ठाकरे गटाला पाठिंबा देणार असल्याची चर्चा गेले काही दिवस सुरू आहे. त्यातच मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार व उमेदवार राजू पाटील यांनी ठाकरे गटाचे उमेदवार राजेश वानखेडे हे माझे मित्र आहेत. मित्र म्हणून त्यांना नक्कीच मदत करणार असे सूतोवाच अंबरनाथ येथे दिले आहेत. पक्षाचा आदेश आल्यावर पुढे पाहू असे म्हणत आमदार पाटील यांनी आताच शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारास घाम फोडत मित्राला दोस्तीचा वादा दिला आहे.
तर मनसैनिक हे माझे मित्र असून ते मला मदत करतील, याची फक्त खात्रीच नव्हे, तर गॅरंटी आहे, अशी प्रतिक्रिया महाविकास आघाडीचे उमेदवार राजेश वानखेडे यांनी दिली आहे

