रेल्वेतील वाचनयात्रेला लवकरच पुन्हा सुरवात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 फेब्रुवारी 2020

मराठी विकास संस्थेच्या प्रकल्पांवर मार्चमध्ये निर्णय

मुंबई : डेक्कन क्वीन व पंचवटी एक्‍स्प्रेस या रेल्वेगाड्यांतील बंद पडलेला वाचनयात्रा प्रकल्प लवकरच पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. सरोजिनी बाबर लोकसाहित्य सादरीकरण स्पर्धा, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे लोककला स्पर्धा आदी प्रकल्पही मार्चमध्ये मार्गी लागण्याची शक्‍यता आहे.

घेणं ना देणं..! नागरिकांना बसतोय तीन हजारांचा भुर्दंड...

मुंबईहून नाशिक व पुण्याकडे दैनंदिन प्रवास करणारा नोकरदार वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. म्हणून दख्खनची राणी व पंचवटी एक्‍स्प्रेस या गाड्यांमध्ये वाचनयात्रा प्रकल्प १५ ऑक्‍टोबर २०१८ रोजी सुरू झाला, परंतु राज्यातील सत्ताबदलानंतर हा प्रकल्प बंद पडला आहे. हा प्रकल्प पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. सर्व बाबींची माहिती घेऊन रेल्वे प्रशासनाशी लवकरच बोलणी करण्यात येतील, असे राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक संजय पाटील यांनी सांगितले.

आणि सुप्रियाच्या माहेरीच पती पत्नीमध्ये सुरु झालं धाब.. धूब.. धाब.. धूब..

वाचन संस्कृती वाढावी यासाठी हाती घेण्यात आलेल्या या उपक्रमाला दोन्ही रेल्वेगाड्यांमधील प्रवाशांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला होता. वर्षभरात या वाचनयात्रेचा लाभ सुमारे २००० प्रवाशांनी घेतला. त्यासाठी राज्य मराठी विकास संस्थेने वाचनदूत नेमले होते. वाचकांकडून विविध पुस्तकांची मागणी केली जात होती. राज्य मराठी विकास संस्थेने आणखी १६ रेल्वेमार्ग आणि चार विमानतळांवर हा प्रकल्प राबवण्याचा प्रस्ताव दिला होता, परंतु जुन्या प्रकल्पाला खीळ बसल्याने पुढे काहीही झाले नाही असे पाटील म्हणाले.

पक्षाच्या सर्व जबाबदाऱ्यांचा दिला राजीनामा, भाजपला मोठा धक्का

लोककलाकार चिंताग्रस्त
राज्य मराठी विकास संस्थेने लोकसाहित्याच्या अभ्यासक दिवंगत सरोजिनी बाबर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त लोकसाहित्य सादरीकरण स्पर्धा, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शाहिरी (पोवाडा व लावणी) लोककला स्पर्धा आयोजित केली आहे. त्यासाठी २५ नोव्हेंबर २०१९ पर्यंत अर्ज मागवण्यात आले. त्याला तीन महिने झाले तरी या स्पर्धा झालेल्या नाहीत. त्यामुळे लोककलाकारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

शिवसेना म्हणतेय, फडणवीस तुम्ही कामाला लागा

रेल्वेगाड्यांतील वाचनदूत प्रकल्प, रंगवैखरी स्पर्धा, सरोजिनी बाबर लोकसाहित्य सादरीकरण स्पर्धा, अण्णा भाऊ साठे लोककला स्पर्धा यांच्या आयोजनाबाबतचे निर्णय मार्चमध्ये घेण्यात येतील.
- संजय पाटील
, संचालक, राज्य मराठी विकास संस्था

Reading journey in the train begins soon


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Reading journey in the train begins soon