राज्यात १७ हजार वैद्यकीय कर्मचाऱ्यांची भरती; सरकारचा मोठा निर्णय

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 21 May 2020

  • राज्यात कोरोना रुग्णांनाचा आकडा 40 हजारावर पोचल्याच्यानंतर अखेर राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने 17 हजार वैद्यकीय कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केरळच्या आरोग्यमंत्र्यांसोबत चर्चा केल्यानंतर याबाबत निर्णय घेतला आहे. आरोग्य विभागातील मुख्य जबाबदारी असणाऱ्या महत्वाच्या वर्ग एक आणि वर्ग दोन अधिकाऱ्यांच्या 600 पदांचाही यात समावेश आहे.

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांनाचा आकडा 40 हजारावर पोचल्याच्यानंतर अखेर राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने 17 हजार वैद्यकीय कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केरळच्या आरोग्यमंत्र्यांसोबत चर्चा केल्यानंतर याबाबत निर्णय घेतला आहे. आरोग्य विभागातील मुख्य जबाबदारी असणाऱ्या महत्वाच्या वर्ग एक आणि वर्ग दोन अधिकाऱ्यांच्या 600 पदांचाही यात समावेश आहे.

ही बातमी वाचली का? मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून जितेंद्र आव्हाडांनी सुचवली ही कल्पना...

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी नुकताच कोरोना नियंत्रणाचा 'केरळ पॅटर्न' जाणून घेतला. कोरोना संकटात केरळ सरकारने केलेल्या उपाययोजनांची माहिती टोपे यांनी केरळच्या आरोग्य मंत्री के.के. शैलजा यांच्याकडून घेतली. त्यानंतर राज्यात आरोग्य विभागातील 17 हजार जागा भरण्यात येणार असल्याची माहिती टोपे यांनी दिली; मात्र भरती प्रक्रिया राबवण्यासाठी आणखी दोन महिने लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

ही बातमी वाचली का? राज्यपालांनी बोलावलेल्या बैठकीला उद्धव ठाकरे गैरहजर पण...

आरोग्य विभागातील डॉक्टर्स, विशेषज्ज्ञ, परिचारिका, कर्मचारी यांची 17 हजार रिक्तपदे येत्या दोन महिन्यात भरण्यात येईल. त्यासाठी विभागाची सविस्तर बैठकही घेण्यात आली. मुलाखती घेऊन ही पदे भरले जातील. शिवाय रुग्णांची खासगी रुग्णालयांकडून लूट थांबविण्यासाठी दरनियंत्रण कायदा केला आणि त्याच्या सक्षम अंमलबजावणीसाठी प्राधिकारीही नेमले आहेत.
- राजेश टोपे, आरोग्य मंत्री.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Recruitment of 17,000 medical staff in the state; Big decision of the government