लाल मिरची, पेरु, मासे आणि बरंच काही.., ठाण्यात मनसेची पशुपक्ष्यांना मेजवानी

mns wwa.
mns wwa.

ठाणे : लाल मिरची, पेरु, केळ, मासे काय नाय ते म्हणू नका...मनसे नेते अमित ठाकरे यांचा वाढदिवस असल्याने या वाढदिवसाची खरी मेजवानी ठाण्यातील डब्ल्युडब्ल्यूए संस्थेच्या रेस्क्यू सेंटरमधील पशूपक्ष्यांना मिळाली. लॉकडाऊन काळात आवडीचे पदार्थ खायला मिळाल्याने या पक्ष्यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांकडे आपला आनंद व्यक्त करुन दाखविला. पशूपक्ष्यांच्या मेजवानीसोबतच रस्त्यावरील भटक्या श्वानांचे लसीकरणही रविवारी करण्यात आले. 

आपल्या वाढदिवसाची पार्टी कशी जंगी झाली पाहीजे असे साऱ्यांनाच वाटते. लॉकडाऊनकाळात आलेल्या वाढदिवसामुळे अनेकांचा यावर्षी नक्कीच हिरमोड झाला आहे. काही लहानग्यांनी आपल्या वाढदिवसाचे जेवण किंवा काही निधी दान करीत गरजूंना मदत करीत वेगळा आदर्शही घालून दिला आहे. आजची वाढदिवसाची पार्टी म्हणजे थोडी आगळी वेगळीच होती. खुद्द मनसे नेते अमित ठाकरे यांचा वाढदिवस असल्याने तो साधेपणाने साजरा करायचा परंतू काय करावे. यावर ठाण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे संदीप पाचंगे यांच्या मार्गदर्शनाखाली मनसेचे प्रभाग अध्यक्ष स्वप्निल महिंद्रकर यांनी चक्क पशूपक्ष्यांनाच मेजवानी देऊ केली. 

ठाण्यातील कोकणापाडा भागातील डब्ल्यूडब्ल्यूए संस्थेच्या पशुपक्षींच्या रेस्क्यू सेंटरमधील माकड, पोपट, गरुड, घुबड, मांजर, कासव आदी पशू पक्ष्यांना त्यांच्या आवडीचे खाद्यपदार्थ आज मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिले. लॉकडाऊनमुळे पशू पक्ष्यांनाही आवडीच्या खाद्यपदार्थ्यांना थोडी मुरड घालावी लागली आहे. त्यांच्या आवडीचे पदार्थ मिळविताना संस्थांनाही खूप कष्ट घ्यावे लागत आहेत. वाढदिवसानिमित्त मात्र या पशू पक्ष्यांना आवडीचे खाद्यपदार्थ मिळाल्याने त्यांनीही आनंद व्यक्त करीत ते पदार्थ गट्टम केले.

भटक्या श्वानांना लसीकरण
कोरोना काळात नागरिकांच्या गरजांकडे लक्ष देताना भटक्या श्वानांच्या लसीकरणाकडेही लक्ष देणे गरजेचे होते. पॉज या प्राणीमित्र संस्थेच्या वतीने रविवारी ठाण्यातील 50 हून अधिक भटक्या कुत्र्यांना अॅण्टी रेबिजचे लसीकरण करण्यात आले. पोखरण रोड क्रमांक दोन, लोकपुरम भागात ही मोहीम राबविण्यात आली. पॉजच्या टिमने श्वानांचे लसीकरण करतानाच त्यांच्या गळ्यात यावेळी रेडीअमचे पट्टे घातले. अनेकदा रात्रीच्यावेळेस वाहनांना धडक बसल्याने अपघातात श्वानांना जीव गमवावा लागतो. अशा चमकणाऱ्या पट्ट्यांमुळे भटके श्वान गाडीसमोर येऊन होणारे अपघात टाळता येतात असे पॉजचे संस्थापक निलेश भणगे यांनी सांगितले.

Red chillies, guavas, fish and much more MNS feast for animals and birds in Thane

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com