नवी मुंबईकरांना मोठा दिलासा! कोरोनाबाधितांच्या संख्येत घट

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 13 May 2020

नवी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाला प्राप्त झालेल्या अहवालापैकी 54 नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे शहरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 910 झाली आहे.

नवी मुंबई : नवी मुंबईत बुधवारी 54 कोरोनाबधित रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या दोन दिवसांत आतापर्यंत 134 रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या आठवड्याची तुलना करता रुग्ण संख्या कमी झाल्याने आरोग्य विभागाने समाधान व्यक्त केले आहे. 

महत्वाची बातमी : मुख्यमंत्री कार्यालयाला टॅग करत अमोल कोल्हेंनी राज्य सरकारकडे केली 'ही' मागणी 

नवी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाला प्राप्त झालेल्या अहवालापैकी 54 नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे शहरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 910 झाली आहे. गेल्या आठवड्यात शहरात तब्बल 400 पेक्षा जास्त नव्या रुग्णांची वाढ झाली होती. 11 मे रोजी शहरात 105 नवे रुग्ण आढळून आल्यामुळे खळबळ माजली होती. एकाच दिवसांत एवढे रुग्ण सापडण्याची ही पहिलीच घटना होती. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून चिंता व्यक्त करण्यात येत होती.  

हे वाचलत का  : अनेकांना जे जमत नाही ते 'या' तीन वर्षांच्या कबीरने केलं, पोलिसांनाही वाटलं लै भारी

रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे पालिका तातडीने उपाययोजना करण्यास सुरुवात केली. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांची संख्या घसरली आहे. गेल्या दोन दिवसांत 134 रुग्ण सापडल्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र महापालिकेने संशयित रुग्णांची केलेल्या चाचण्यांचे एक हजार 313 अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.

Registration of 54 new corona positive patients in Navi Mumbai


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Registration of 54 new corona positive patients in Navi Mumbai