स्टेन स्वामी याच्या नातेवाईकांनी घेतली मुंबई उच्च न्यायालयात धाव

स्वामी यांचे नक्षलवादी संघटनांशी संबंध अनेक प्रकारे ते कारवायामध्ये सामील होते, आरोप एनआयएने केला
Mumbai
Mumbaisakal

मुंबई : एल्गार परिषद (Elgar Parishad) प्रकरणातील आरोपी फादर स्टैन स्वामी (Father Stan Swami) यांच्यावर विशेष न्यायालयाने (court) ओढलेले ताशेरे मागे घेण्यासाठी स्वामी यांच्या नातेवाईकांनी (family) मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) याचिका दाखल केली आहे. स्वामी यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले आहे.

पार्किसन्ससह अन्य आजारांची बाधा झालेले स्वामी 84 वर्षांचे होते. खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांना मागील वर्षी एनआयएने झारखंडमधून अटक केली होती. घटनेच्या अनुच्छेद 21 नुसार मृत व्यक्तीला सन्मान मिळण्याचा अधिकार आहे. ज्याप्रमाणे स्वामी यांना हे ताशेरे काढण्याची मागणी करण्याचा अधिकार होता तसेच त्यांच्या निधनानंतर त्यांच्या निकटवर्तीयांना अशी मागणी करण्याचा अधिकार आहे असे जमशेदपूर जेसूट प्रोव्हीन्स या सामाजिक संस्थेने याचिकेद्वारे केली आहे.

स्वामी यांनी जामीनावर मुक्त होण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. त्यावेळी एनआयएने त्यांच्या विरोधात गंभीर आरोप केले होते. विशेष न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य मानून जामीन नामंजूर केला होता. हे ताशा आणि आरोप रद्द करावे कारण त्यावर पुरावा दाखल झाला नाही, या आरोपांमुळे त्यांच्या कार्यावर कलंक लागत आहे, त्यामुळे ते रद्दबातल करावे, अशी मागणी एड मिहीर देसाई यांनी केली आहे.

Mumbai
गडचिरोली पोलिस, नक्षलवादी चकमकप्रकरणी सी-४७ अलर्ट- प्रमोदकुमार शेवाळे

स्वामी यांचे नक्षलवादी संघटनांशी संबंध असून अनेक प्रकारे ते त्यांच्या कारवायामध्ये सामील होते, असा आरोप एनआयएने केला आहे. एकूण वीस आरोपांचा प्रस्तावित मसुदा न्यायालयात तपास अधिकाऱ्यांनी दाखल केला आहे. यामध्ये भादंवि, यूएपीए आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याचा समावेश आहे. अद्याप या प्रकरणात आरोप निश्चित झाले नसून एकूण पंधरा आरोपी सध्या आहेत. स्वामी कोठडीत असताना मृत्यू झाल्यामुळे या प्रकरणात चौकशी करण्याची मागणीही देसाई यांनी केली आहे. तळोजा कारागृहात त्यांच्या उपचारांवर व्यवस्थित काळजी घेतली नाही, असा आरोप करण्यात आला आहे. स्वामी या प्रकरणात सर्वात ज्येष्ठ आरोपी होते. त्यांच्या मृत्यूनंतर सामाजिक स्तरावर संमिश्र प्रतिक्रिया निर्माण झाल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com