परमबीर सिंह यांना २२ जून पर्यंत अटक नाही करता येणार

रश्मी शुक्ला यांची याचिकाही तूर्तास तहकूब
parambir singh
parambir singh Google

मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (parambir singh) यांना उच्च न्यायालयाने अटकेपासून दिलासा दिला होता. हा दिलासा 22 जूनपर्यंत कायम राहणार आहे. या प्रकरणाची सुनावणी घेत असलेलं न्यायमूर्ती एस.एस. शिंदे यांचं कोर्ट आज चालू नसल्यानं निर्णय घेण्यात आला. (relief to parambir singh from arrest will continue till 22 nd june)

एट्रोसिटी कायद्यातंर्गत दाखल झालेला एफआयआर रद्द करण्याच्या मागणीसाठी परमबीर सिंह यांनी दाखल केलेल्या याचिकेची सुनावणीही तहकूब करण्यात आली आहे. २२ जूनपासून नियमित सुनावणी सुरु होईल. पुढील सुनावणीपर्यंत त्यांना अटक करणार नाही, अशी सरकारी वकिलाने कोर्टात हमी दिली.

parambir singh
मुंबई: महिला पोलीस अधिकाऱ्यावर बलात्कार, FB वरुन मैत्री

फोन टॅपिंग प्रकरणी FIR रद्द करण्यासाठी रश्मी शुक्ला यांनी सुद्धा याचिका दाखल केली होती. ही याचिकाही २२ जूनपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. पुढच्या सुनावणीपर्यंत अटक करणार नाही, असे राज्य सरकारने म्हटले आहे.

parambir singh
धक्कादायक! मालाडमधल्या बेकरीत केकमधून ड्रग्ज विक्री

राज्य गुप्तवार्ता विभागातील गोपनीय पत्र आणि इतर तांत्रिक माहिती लीक झाल्याप्रकरणी अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आली आहे. ऑफीशियल सिक्रेट ऍक्टनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी पोलिस पोस्टिंगशी संबंधित माहिती पुसल्याबद्दल अज्ञात व्यक्तींविरूद्ध मुंबई पोलिसांनी FIR दाखल केला आहे. हा एफआयआर रद्द करण्याची मागणी करणार्‍या याचिकेची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाने तहकूब केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com