लोखंडी गज, दगड-विटा फेकत पोलिसांवर हल्ला, पण 'ते'पण कच्च्या गुरुचे चेले नव्हते

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 6 February 2020

नायगाव मधील जुचंद्र येथे गुरूवारी पहाटे दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात दोन पोलिस जखमी झाल्याची घटना घडली. या वेळी पोलिसांनी जीवाची बाजी लावत दोन दरोडेखोरांना अटक केली. तर एक दरोडेखोर अधाराचा फायदा घेत फरार झाला. 

नालासोपारा, मुंबई  : नायगाव मधील जुचंद्र येथे गुरूवारी पहाटे दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात दोन पोलिस जखमी झाल्याची घटना घडली. या वेळी पोलिसांनी जीवाची बाजी लावत दोन दरोडेखोरांना अटक केली. तर एक दरोडेखोर अधाराचा फायदा घेत फरार झाला. 

मोठी बातमी - ज्याने कुणी गंठण चोरले असेल, तो उद्याच्या उद्या मरेल..

नायगाव पुर्व जूचंद्र येथील मुथ्थुट फायनान्सच्या कार्यायात गुरुवार (ता. 6 ) रोजी पहाटे अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास भिंत तोडून दरोडेखोरांनी कार्यालयात प्रवेश केला. त्यावेळी कार्यालयातील सिक्‍युरिटी सिस्टमचा अलार्म वाजला. याची माहिती वालीव पोलिसांना मिळताच गस्तीवर असणारे पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहचले. पोलिसांची चाहूल लागताच दरोडेखोरांनी पोलिसांवर दगड, वीट, लोखंडी गजाने पोलिसांवर प्राणघातक हल्ला केला. पण या हल्ल्याला न डगमगता वालीव पोलिसांनी जीवाची बाजी लावत तीन दरोडेखोरां पैकी 2 जणांना पकडण्यात यश मिळविले, तर एकजण अंधाराचा फायदा घेत फरार झाला. या हल्ल्यात यात 2 पोलीस गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी 3 कोटी रुपयांचा दरोड्याचा डाव उधळल्यामुळे पोलीसांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 

मोठी बातमी -  सावधान! नवी मुंबईत डोक्यावर पडतायत वीजेचे खांब..

या हल्ल्यात पोलीस नाईक संभाजी पालव आणि प्रदीप कुंभार असे जखमी पोलीस कर्माचाऱ्यांची नाव आहेत. तर बाबर मुन्ना शहा आणि मुकशेद चांनू शेख दोघेही (रा. लालम पट्टी, हाजीअली उड्डाणपूला जवळ, माहिम) असे अटक करण्यात आलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत. तर त्यांचा साजन नावाचा साथीदार पोलिसांवर हल्ला करून फरार झाला आहे. 

मोठी बातमी - एक वर्षाच्या मोहम्मदला घरबसल्या मिळाले 7 कोटी

पोलिसांची धाडसी कारवाई 
गुरुवारी पहाटे अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास या दरोडेखोर मुथुट फायनान्स कंपनीच्या कार्यालयाच्या पाठीमागील भिंतीचे ग्रील तोडून आत प्रवेश करत तिजोरी तोडण्याचा प्रयत्न करीत होते. यावेळी वालीव पोलीस ठाणे अंतर्गत असणाऱ्या बाफाने चौकीच्या गस्तीवर असणाऱ्या पोलीस नाईक संभाजी पालव आणि प्रदीप कुंभार यांना मिळाली. त्यांनी तात्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास चौगुले यांना याची माहिती दिली. तोपर्यंत पोलीस नाईक संभाजी पालाव आणि प्रदीप कुंभार या दोघांनी दरोडेखोरांना घेरून ठेवले होते. या वेळी दरोडेखोरांनी पालव आणि कुंभार यांच्यावर लोखंडी गज, दगड, वीट यांनी प्राणघातक हल्ला ही केला. तोपर्यंत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास चौगुले आपल्या पथकासह घटनास्थळावर पोहचले होते. या घटनेत पोलिसांनी दोघा दरोडेखोरांना पकडले मात्र एकजण अंधाराचा फायदा घेत पळून गेला. दरम्यान जखमी पोलिसांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

मोठी बातमी -  बांगलादेशातील उपासमारीला कंटाळून आलो; सात महिलांना अटक!

दरोड्याची माहिती आम्हाला मिळाल्यानंतर आमचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी पोहचले. या वेळी दरोडेखोरांनी दोघा कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. मात्र आम्ही दरोडेखोरांना पकडण्यात यश मिळविले. अटक केलेल्या आरोपींकडून आणखी गुन्ह्यांची उकल होण्याची शक्‍यता आहे.  - विलास चौगुले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वालीव 

robbers attacked cops by throwing iron rods and brick


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: robbers attacked cops by throwing iron rods and brick