रोहित पवारांचा मराठी मुलांना मोलाचा सल्ला, म्हणालेत....

रोहित पवारांचा मराठी मुलांना मोलाचा सल्ला, म्हणालेत....

मुंबई- कोरोनाचे महाराष्ट्रात भलेमोठं संकट उभं टाकलं आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. लॉकडाऊनच्या काळात सर्वच व्यवहार ठप्प झाले. त्यामुळे राज्यातील अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. त्यामुळे राज्य सरकारनं मोठे आर्थिक निर्णय घेतलेत. यावर्षी कुठल्याही कर्मचाऱ्याची बदली करण्यात येणार नाही. इतकंच नाही तर सध्या सुरु असलेली सर्व कामं स्थगित करण्याचे आदेश अर्थखात्याने दिले आहेत. तसंच  राज्यात कुठल्याही प्रकारची नवी नोकरभरती होणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे. राज्य सरकारच्या या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सरकारला एक पर्याय सुचवला आहे.

कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती बिकट झाल्याने अजित पवार यांच्या अर्थखात्याने कडक पावलं उचलली आहेत. कोरोनामुळे होणारं संकट हे दिर्घकाळ चालणारं असल्यानं आगामी काळात भासणारी तरतूद लक्षात घेताल अर्थमंत्रालयाने सर्व विभागांवर कठोर आर्थिक निर्बंध लादले आहेत.

कुठल्याही प्रकारची नोकरभरती न करण्याचे आदेश अर्थविभागाने दिले आहेत. सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. 

रोहित पवारांनी एका ट्विटच्या माध्यमातून हा पर्याय सुचवला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं की, कोरोनामुळे आलेल्या वित्तिय संकटामुळे सरकारने यंदा नोकरभरती रद्द केली,पण वयाच्या अटीमुळे अनेक युवा age bar होतील. त्यामुळे सरकारने भरती रद्द न करता एक वर्षासाठी मोफत सेवा/किमान वेतन द्यावे. यामुळे युवांना नोकरी व सरकारला मनुष्यबळ मिळेल याला युवा सहकार्य करतील, असा विश्वास वाटतो. 

दरम्यान रोहित पवारांनी आणखी एक ट्विट करत म्हटलं की, लॉकडाऊन शिथिल होत असतानाच अनेक कामगार/मजूर स्वगृही जात आहेत. परराज्यातील या कामगारांअभावी उद्योग-व्यवसाय सुरू करण्यात अडचण येऊ शकते. पण हे कामगार परत गेल्याने निर्माण झालेल्या संधीचा फायदा मराठी मुलांनी उठवावा आणि आजच्या संकटात कोणतंही काम कमी दर्जाचं समजू नये. 

नवी कामं सरकारकडून स्थगित 

सध्याची सर्व कामं स्थगित करण्याचे आदेश, नवीन कामांचं प्रस्तावही सादर करता येणार नाही. कुठल्याही प्रकारची नोकरभरती न करण्याचे आदेशही सर्व विभागांना सरकारकडून देण्यात आलेत. आरोग्याशी सोडून कुठल्याही खात्याला बांधकाम न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रत्येक विभागाला फक्त 33 टक्के इतकीच रक्कम दिली जाणार आहे. आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, मदत पुर्नवसन, अन्न पुरवठा या खात्यांना प्राधान्यानं निधी जाणार आहे.

सरकार आयोजित सर्व कार्यक्रम रद्द 

राज्य सरकार आयोजित जे जे कार्यक्रम होत असतात ते सुद्धा आता रद्द करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमांवर मोठ्या प्रमाणात खर्च होत असतो, मात्र ते कार्यक्रम आता रद्द करण्यात येतील.

rohit pawar gave valuable advice to marathi boys and girls read full story

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com