

Sachin Ahir Uddhav Thackeray
esakal
Uddhav Thackeray News : विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम ठोकत शिंदे सेनेत प्रवेश केला. यानंतर मुंबईच्या राजकारणात आणखी एका मोठ्या राजकीय घडामोडीची चर्चा रंगली आहे. सचिन अहिर आता मुंबईत अॅक्शन मोडवर आले आहेत. एकनाथ शिंदे यांच्याकडून सचिन अहिर यांच्यावर मुंबईची जबाबदारी सोपवल्याची चर्चा आहे. अशातच आता शिंदे गटाच्या नगरसेवकांच्या बैठकीत ठाकरे गटातील बेस्ट समिती सदस्य दिसून आल्याने खळबळ उडाली.